_202610221654349393_H@@IGHT_350_W@@IDTH_696.jpg)
कल्याण: (Solid Waste Management Workshop)कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतर्फे घनकचरा व्यवस्थापन जनजागृती कार्यक्रमांतर्गत शिक्षकांसाठी एकदिवसीय प्रशिक्षण कार्यशाळा बुधवारी आचार्य प्रल्हाद केशव अत्रे रंगमंदिर, कल्याण येथे उत्साहात पार पडली.
या उपक्रमाचे मुख्य काम कौटिल्य मल्टीक्रिएशन प्रायव्हेट लिमिटेड यांच्याकडे असून, असिमेट्रिकल लर्निंग आणि कुशाग्र इनोव्हेशन फाउंडेशन यांनी ही कार्यशाळा आयोजित केली.
महानगरपालिका, खासगी अनुदानित आणि विनाअनुदानित अशा सर्व प्रकारच्या शाळांमधील ४०० हून अधिक शिक्षकांनी या कार्यशाळेत सहभाग घेतला. घनकचरा व्यवस्थापन म्हणजे केवळ कचऱ्याची विल्हेवाट नव्हे, तर शिक्षकांनी 'इम्पॅक्ट अँबॅसॅडर' म्हणून समाजात बदल घडवण्यासाठी काय करायला हवे, यावर कार्यशाळेचा भर होता.(Solid Waste Management Workshop)
प्रशिक्षक जितेंद्र साळी आणि रोहित कांबळे यांनी हे प्रशिक्षण अतिशय प्रभावीपणे घेतले. आदिती देवधर यांनी तयार केलेल्या वर्कबुकच्या आधारे "कचरा नेमका निर्माण कुठून होतो?" आणि "निसर्गात कचरा का नसतो?" अशा सोप्या प्रश्नांमधून सखोल वैचारिक मंथन झाले. विविध खेळ आणि उपक्रमांमध्ये शिक्षकांनी उत्साहाने सहभाग घेतला.
रिफ्यूज, रिड्यूस, रिथिंक ते रिसायकल अशा 7 आर संकल्पनेवर विशेष चर्चा झाली. जगभरातील केस स्टडीज, उदाहरणे आणि दृश्य सादरीकरणांच्या माध्यमातून कचऱ्याच्या समस्येची व्याप्ती मांडण्यात आली. कचऱ्याचे वर्गीकरण कसे करावे, एवढेच नव्हे तर ते तसे का केले जाते आणि त्यामागील प्रत्यक्ष आकडेवारी काय सांगते, हेही शिक्षकांनी समजून घेतले.(Solid Waste Management Workshop)
प्रशिक्षित शिक्षक आता आपल्या शाळांमध्ये देण्यात आलेले सेग्रिगेशन कॉर्नर, वर्कबुक आणि फ्लॅशकार्ड्स यांचा वापर करून विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करतील आणि कल्याण डोंबिवलीला कचरामुक्त, स्वच्छ भविष्याकडे नेण्यात महत्त्वाची भूमिका बजावतील.
शिक्षण अधिकारी विजय सरकटे यांनी कार्यक्रमास उपस्थित राहून शिक्षकांशी संवाद साधला आणि त्यांचा उत्साह वाढवला. कार्यक्रमाची सांगता असिमेट्रिकल लर्निंगच्या सहसंस्थापिका केतकी सोहोनी यांनी केली.(Solid Waste Management Workshop)