हुतींच्या हल्ल्यांनी सौदी अरेबिया हादरले! विमानतळ आणि तेल क्षेत्रांना लक्ष्य; एकाच महिन्यात पाच मोठे हल्ले

Saudi Arabia Airport Attack
 
रियाध (Saudi Arabia Airport Attack) : सौदी अरेबियातील दम्माम येथील किंग फहद आंतरराष्ट्रीय विमानतळावर बुधवार, दि. २१ ऑक्टोबर रोजी रात्री हुती बंडखोरांकडून हल्ला करण्यात आल्याचे वृत्त आहे. या घटनेत एका भारतीय नागरिकाचा मृत्यू झाल्याची माहिती भारतीय दूतावासाने दिली आहे. सौदी अरेबियाच्या नागरी विमान वाहतूक प्राधिकरणानुसार, विमानतळावरील हल्ल्यात १० जण जखमी झाले आहेत. दरम्यान, देशाच्या पूर्वेकडील तेल क्षेत्रात ड्रोन अडवल्यानंतर त्याचे अवशेष पडल्यानेही जीवितहानी झाल्याचे वृत्त समोर आले आहे.
 
विमानतळावरील हल्ल्यात भारतीय नागरिकाचा मृत्यू
 
भारतीय दूतावासाने दिलेल्या माहितीनुसार, दम्माम विमानतळावरील हल्ल्यात एका भारतीय नागरिकाचा मृत्यू झाला, तर दोन भारतीय नागरिक जखमी झाले. सौदी अरेबियाच्या नागरी विमान वाहतूक प्राधिकरणाने या घटनेत १० जण जखमी झाल्याचे सांगितले. जखमींपैकी काहींची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे. हल्ल्यानंतर विमानतळाचे नुकसान झाले असून, काही विमानांचे मार्ग बदलण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. (Saudi Arabia Airport Attack )
तेल क्षेत्रातील घटनेतही जीवितहानी
 
सौदी अरेबियाच्या तेल क्षेत्रात ड्रोन अडवल्यानंतर त्याचे अवशेष पडल्याने दोन परदेशी कामगारांचा मृत्यू झाला, तर अन्य दोघे जखमी झाले. मृतांमध्ये नेपाळ आणि फिलिपिन्सच्या नागरिकांचा समावेश असल्याचे वृत्त आहे. जखमींमध्ये पाकिस्तान आणि भारताच्या नागरिकांचा समावेश असल्याचे सांगण्यात आले आहे. (Saudi Arabia Airport Attack )
 
महिन्याभरात सौदी अरेबियातील विमानतळांवर हल्ल्यांची मालिका
ऑक्टोबर महिन्यात सौदी अरेबियातील विविध विमानतळांना लक्ष्य करण्यात आले आहे. दि. ६ ऑक्टोबर रोजी जिझान आणि नजरान येथील विमानतळांवर हल्ले झाल्याचे वृत्त आले होते. त्यानंतर ७ आणि ८ ऑक्टोबर रोजी रियाध आणि अभा येथील विमानतळांवर हल्ले झाले. या घटनांमध्ये नागरिकांचा मृत्यू झाला, अनेक जण जखमी झाले आणि सौदी एअरलाईन्सच्या एका विमानाचेही नुकसान झाले. (Saudi Arabia Airport Attack)
 
१० ऑक्टोबर रोजी रियाध येथील किंग खालिद आंतरराष्ट्रीय विमानतळावर झालेल्या हल्ल्यात १३ जणांचा मृत्यू झाला, तर ३०० हून अधिक जण जखमी झाले. ११ ऑक्टोबर रोजी याच विमानतळावर झालेल्या आणखी एका हल्ल्यात एका पाकिस्तानी नागरिकाचा मृत्यू झाला आणि ११ जण जखमी झाले. या घटनांमुळे विमानसेवेवर परिणाम झाला असून, काही विमानतळांवरील कामकाज तात्पुरते विस्कळीत झाले. (Saudi Arabia Airport Attack)
 
अमेरिकेचे आपल्या अधिकाऱ्यांना सौदी अरेबिया सोडण्याचे निर्देश
 
सुरक्षेच्या वाढत्या चिंतेच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेने सौदी अरेबियातील काही सरकारी अधिकाऱ्यांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना देश सोडण्याचे निर्देश दिल्याचे वृत्त आहे. अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने आपल्या कर्मचाऱ्यांची आणि त्यांच्या कुटुंबीयांची सुरक्षा सर्वोच्च प्राधान्य असल्याचे स्पष्ट केले आहे.
 
आखाती प्रदेशातील वाढत्या हल्ल्यांमुळे आणि इराणविरोधातील संभाव्य लष्करी कारवाईच्या चर्चेमुळे पश्चिम आशियातील सुरक्षेची परिस्थिती अधिक संवेदनशील बनली आहे. (Saudi Arabia Airport Attack)
 
 




मुंबई तरुण भारत वेब टीम

Hello, You must be familiar with the Nation First approach daily 'Mumbai Tarun Bharat' as a newspaper committed to fearless and nationalist ideals and constantly doing conscious journalism for it. The journey of four decades has been successful only because of your trust and cooperation. Dear readers, we have been making a successful effort to always be perfect in our commitment to the thoughts of the nation and the national interest...
 
Changing with time is essential for any organization. Daily 'Mumbai Tarun Bharat' has decided to take this role here too and make 'MahaMTB' available in the media for the new 'smart' generation. Today's youth, readers, and citizens are becoming more and more 'smart' day by day. And in today's 'smart' era, information is available in abundance in the Internet-enabled information explosion. However, there is a need for complementary knowledge to determine a modern role and approach that is compatible with culture, motionlessness and tradition.
 
That is why mahamtb.com, MahaMTB Mobile App', MahaMTB Youtube Channel, MahaMTB Facebook Page, MahaMTB Twitter, MahaMTB Instagram, MahaMTB Telegram, MahaMTB WhatsApp Group etc. through social media and advanced avatar content. We are coming before you. Role in the new era, 'smart' journalism with a view, 'smart' multimedia for the new era, and journalism for a 'smart' Maharashtra will be the side of the game.
 
Now get all the updates in one click! mahamtb.com
संबंधित मजकूर