नवी दिल्ली (Dawood Ibrahim UN Report India Response) : संयुक्त राष्ट्रांच्या एका विशेष प्रतिनिधींनी दाऊद इब्राहिमच्या ‘डी-कंपनी’ला भारतस्थित गुन्हेगारी गट म्हटले आहे. यावर भारताने संयुक्त राष्ट्रांच्या अहवालातील या उल्लेखाला तीव्र आक्षेप घेत, संबंधित दावे फेटाळून लावले आहेत. अहवालातील तथ्यात्मक चुकांकडे लक्ष वेधत भारताने इशारा दिला की, अशा चुकांमुळे संयुक्त राष्ट्रांसारख्या जागतिक संघटनेच्या विश्वासार्हतेला गंभीर धक्का बसू शकतो.
संयुक्त राष्ट्रांतील भारताच्या स्थायी मिशनचे प्रथम सचिव रघु पुरी यांनी बुधवार, दि. २१ ऑक्टोबर रोजी संयुक्त राष्ट्र महासभेच्या तिसऱ्या समितीत भाषण केले. दहशतवादाचा सामना करताना मानवी हक्क आणि मूलभूत स्वातंत्र्यांचे संवर्धन व संरक्षण करण्यासंदर्भातील संयुक्त राष्ट्रांचे विशेष प्रतिनिधी बेन सॉल यांच्या अहवालावर त्यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले.
भारताचे संयुक्त राष्ट्रांना प्रत्युत्तर
भारताच्या स्थायी मिशनचे प्रथम सचिव रघु पुरी यांनी भाषणादरम्यान सांगितले, “आमचे प्रतिनिधी मंडळ इतर मंचांवरही हा मुद्दा उपस्थित करत आहे की, विशेष प्रतिनिधींनी तथ्यात्मक चुका असलेले अहवाल प्रसिद्ध करणे आणि त्यासाठी त्यांना जबाबदार न धरणे, ही अस्वीकार्य परिस्थिती आहे.” (Dawood Ibrahim UN Report India Response)
ते पुढे म्हणाले, “यामुळे सदस्य देशांसमोर अशी परिस्थिती निर्माण झाली आहे, ज्यात बदल करणे कठीण आहे. ज्या संघटनेच्या वैधतेला आधीच आव्हानांचा सामना करावा लागत आहे, तिच्यासाठी ही दुर्दैवी परिस्थिती आहे. या संदर्भात, मला माझ्या देशाशी संबंधित काही अत्यंत गंभीर चुकांकडे लक्ष वेधायचे आहे.”
बेन सॉल यांच्या अहवालात २००३ मध्ये संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने अल-कायदाशी संबंध असल्याच्या कारणावरून भारतस्थित ‘डी-कंपनी’ या गुन्हेगारी गटाच्या नेत्याचा निर्बंधांच्या यादीत समावेश केल्याचे नमूद करण्यात आले होते. यावर प्रतिक्रिया देताना पुरी म्हणाले, “हे वाक्य स्वतंत्रपणे वाचल्यास, वास्तवापेक्षा पूर्णपणे वेगळे चित्र समोर येते.” (Dawood Ibrahim UN Report India Response)
दाऊद भारतात वॉन्टेड आहे
पुरी यांनी ‘डी-कंपनी’ला भारतस्थित गुन्हेगारी गट संबोधण्याच्या उल्लेखाला ठाम विरोध केला. त्यांनी स्पष्ट केले की, ‘डी-कंपनी’ आणि तिचा प्रमुख दाऊद इब्राहिम हे १९९३ मध्ये भारतात झालेल्या दहशतवादी हल्ल्यांप्रकरणी भारतात वॉन्टेड आहेत. (Dawood Ibrahim UN Report India Response)
संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या अल-कायदा निर्बंध प्रणालीचा संदर्भ देत ते म्हणाले की, दाऊद इब्राहिमचा यादीत समावेश करण्यामागील कारणांच्या अधिकृत नोंदीत या बाबी स्पष्टपणे नमूद आहेत. या तथ्यांचा उल्लेख न करणे ही गंभीर चूक असल्याचेही त्यांनी म्हटले.
पुरी पुढे म्हणाले, “मी अधिकृत नोंदींसाठी ही बाब स्पष्ट करू इच्छितो. २००३ मध्ये यादीत समावेश होण्याच्या बराच आधीच ही व्यक्ती भारतातून फरार झाली होती. त्यानंतर देशाबाहेर असतानाच अल-कायदा आणि ओसामा बिन लादेनशी संबंधित असल्यामुळे तिचा या यादीत समावेश करण्यात आला.” (Dawood Ibrahim UN Report India Response)
पुरी यांनी दाऊद इब्राहिम हा भारतातील वॉन्टेड गुन्हेगार असल्याचे सांगितले. दाऊद पाकिस्तानमध्ये असल्याचा उल्लेख आहे. याच संदर्भात पुरी यांनी दाऊद ज्या देशात आहे, त्याच देशात अल-कायदाचा प्रमुख ओसामा बिन लादेन सापडला आणि मारला गेला, असे नमूद केले. त्यांचा स्पष्ट रोख पाकिस्तानकडे होता.
२०११ मध्ये पाकिस्तानमधील अबोटाबाद शहरात अमेरिकेच्या नेव्ही सील्सने केलेल्या कारवाईत ओसामा बिन लादेन मारला गेला होता. याच घटनेचा संदर्भ देत रघु पुरी यांनी संयुक्त राष्ट्रांच्या अहवालातील उल्लेखावर आक्षेप नोंदवला. (Dawood Ibrahim UN Report India Response)
Hello, You must be familiar with the Nation First approach daily 'Mumbai Tarun Bharat' as a newspaper committed to fearless and nationalist ideals and constantly doing conscious journalism for it. The journey of four decades has been successful only because of your trust and cooperation. Dear readers, we have been making a successful effort to always be perfect in our commitment to the thoughts of the nation and the national interest...
Changing with time is essential for any organization. Daily 'Mumbai Tarun Bharat' has decided to take this role here too and make 'MahaMTB' available in the media for the new 'smart' generation. Today's youth, readers, and citizens are becoming more and more 'smart' day by day. And in today's 'smart' era, information is available in abundance in the Internet-enabled information explosion. However, there is a need for complementary knowledge to determine a modern role and approach that is compatible with culture, motionlessness and tradition.
That is why mahamtb.com, MahaMTB Mobile App', MahaMTB Youtube Channel, MahaMTB Facebook Page, MahaMTB Twitter, MahaMTB Instagram, MahaMTB Telegram, MahaMTB WhatsApp Group etc. through social media and advanced avatar content. We are coming before you. Role in the new era, 'smart' journalism with a view, 'smart' multimedia for the new era, and journalism for a 'smart' Maharashtra will be the side of the game.