‘उद्धव ठाकरे महाराष्ट्रात दाऊद इब्राहीमच्या भूमिकेत’: मंत्री नितेश राणे

दसरा मेळाव्यातील भाषणावरून ठाकरेंवर टीका; उद्धव ठाकरेंसह राहुल गांधी आणि संजय राऊतांवरही निशाणा


 Nitesh Rane on Uddhav Thackeray
 
मुंबई, : (Nitesh Rane on Uddhav Thackeray)“उद्धव ठाकरे मुंबई आणि महाराष्ट्रात दाऊद इब्राहीमच्या भूमिकेमध्ये आहे. सगळ्या जिहाद्यांना बांगलादेशी रोहिंग्याना ताकद देण्याचे काम उद्धव ठाकरे महाराष्ट्रात मुंबईत करत आहे," असा आरोप मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी केला. विजयादशमीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत दादर येथे छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर झालेल्या दसरा मेळाव्यातील उद्धव ठाकरेंच्या भाषणावरून मंत्री नितेश राणे यांनी पत्रकार परिषद घेत ठाकरे गटावर जोरदार निशाणा साधला.
 
मंत्री नितेश राणे म्हणाले, “शिवाजी पार्कवर शरिया की गुंज किंबहुना शरिया समर्थनात आपल्याला उबाठाचा दसरा मेळावा घेण्यात आला. रेजिम चेंजची भाषा आजच्या तारखेला उमर खालिदचे समर्थक करत आहेत. दिमागी नक्षल करत आहेत.” अभिजीत दिपके यांच्या समर्थनावरून उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना राणे म्हणाले, “ज्या अभिजीत दिपकेचे काल छाती ठोक पद्धतीने जाहीर समर्थन करत होते तो अभिजीत दिपके हा उमर खालिदचा समर्थक आहे. हा उमर खालिद अफझल गुरूचा समर्थक आहे. म्हणजे उद्धव ठाकरे अफझल गुरूचा समर्थक झाला.”(Nitesh Rane on Uddhav Thackeray)
 
संजय राऊत यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याबाबत केलेल्या विधानावर प्रत्युत्तर देताना राणे यांनी उद्धव ठाकरे यांची तुलना दाऊद इब्राहीमशी केली. ते म्हणाले, दुसऱ्यांना लॉरेन्स बिश्नोई बोलण्यापेक्षा उद्धव ठाकरे दाऊद इब्राहीम होऊन देशाच्या विरोधी असलेल्या सगळ्यांना मदत करत आहे त्याबाबतीमध्येही संजय राऊतांनी बोलावे असेही नितेश राणे म्हणाले.
 
हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्ववादी विचारांचा उल्लेख करत राणे म्हणाले, “बाकी सगळी भाषणांमध्ये त्यांचे वाक्य वापरण्यापेक्षा बाळासाहेब म्हणायचे आय एम अ मॅड मॅड हिंदू ते बोलण्याची हिम्मत उद्धव ठाकरेंची आहे का?” बाळासाहेब ठाकरे यांनी शिवाजी पार्कवरून हिंदुत्वाचा विचार बळकट केला; मात्र त्याच ठिकाणी उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्वविरोधी शक्तींना समर्थन दिल्याचा आरोप त्यांनी केला. “म्हणून मी अगोदरच सांगितलेलं मागे व्यासपीठावर बॅनरवर बाळासाहेबांचा मासाहेबांचा फोटो लावू नका. मोहम्मद अली जिन्ना आणि उमर खालिदचा लावा,” अशी उपरोधिक टीकाही राणे यांनी केली.
 
‘रेजिम चेंज’च्या विधानावरून संजय राऊत यांना लक्ष्य करताना राणे म्हणाले, संजय राऊत राहुल गांधी व्हिएतनामला गेलेत म्हणून रेजिम चेंज होणार म्हणत आहे. राहुल गांधी यांच्या खांद्यावर बसून सरकार बदलण्याची भाषा केली जात आहे. म्हणजेच उद्धव ठाकरेंची तेवढी ताकद आणि लायकी नसल्याचे संजय राऊत भर सभेत सांगत असल्याची खोचक टिप्पणीही राणेंनी केली.(Nitesh Rane on Uddhav Thackeray)
 
राहुल गांधी यांच्या परदेश दौऱ्यांवरही राणे यांनी गंभीर आरोप केले. “आतापर्यंत राहुल गांधी जेव्हा जेव्हा परदेशात जातात तेव्हा तेव्हा डीप स्टेटच्या लोकांना भेटतानाचे ट्वीट आणि फोटोग्राफ आम्ही पाहिलेले आहेत. फ्रान्स, बेल्जियम, इटली आणि ब्रिटनमधील कथित अशांतता निर्माण करणाऱ्या शक्तींशी राहुल गांधी संपर्क साधत असल्याचा आरोप त्यांनी केला.
कायदा आणि सुव्यवस्थेच्या मुद्द्यावरून राणे यांनी दिशा सालियन आणि सुशांतसिंह राजपूत प्रकरणांचा उल्लेख केला. दिशा सालियन यांच्या वडिलांच्या एफआयआरमध्ये उद्धव ठाकरे यांचे नाव असल्याचा दावा करत त्यांनी ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले. सुशांतसिंह राजपूत यांच्या पोस्टमॉर्टेमबाबतही त्यांनी तत्कालीन सरकारवर प्रश्न उपस्थित केले.(Nitesh Rane on Uddhav Thackeray)
 
अभिनेता टायगर श्रॉफ यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा संदर्भ देत राणे यांनी मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारच्या कारवाईचे समर्थन केले. “टायगर श्रॉफ वर हल्ला झाल्यानंतर अन्य राज्यांबरोबर कोऑर्डिनेशन करून चोवीस तासांमध्ये त्या गुन्हेगारांना पकडण्याचे काम मुख्यमंत्री, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने केले,” असे ते म्हणाले. ठाकरेंवर टीका करताना त्यांनी पुढे म्हटले, “मुलाचे थेरं लपवण्यासाठी आम्ही पोलिसांचा वापर करत नाही. खोटे गुन्हे टाकत नाही.”
 
दसरा मेळाव्यावरील टीका करताना राणे म्हणाले, “खरंतर शिवाजी पार्कवर गौमूत्र शिंपडलं पाहिजे. हे सगळे अपवित्र लोक शिवाजी पार्कवर पाकिस्तानच्या स्क्रिप्ट वाचून दाखवतात,” असे ते म्हणाले. उद्धव ठाकरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी उमर खालिदला मदत करण्याची भाषा केल्याचा आरोप करत, महाराष्ट्रातील हिंदू समाज त्यांना माफ करणार नसल्याची भावनाही नितेश राणेंनी यावेळी व्यक्त केली.(Nitesh Rane on Uddhav Thackeray)
 
संजय राऊत यांनी एप्रिलमध्ये मोदी सरकार पडेल, असे भाकीत केल्याच्या विधानाचाही नितेश राणेंनी समाचार घेतला. ते म्हणाले, एप्रिलपर्यंततर आमचं सरकार पडणार नाही. पडण्याची शक्यता पण नाही. पंतप्रधान मोदी भारताच्या प्रत्येक नागरिकाच्या हृदयात आहेत. मात्र उद्धव ठाकरे यांचे पुत्र जानेवारी २०२७ पर्यंत मातोश्रीवर असतील की नाही. जानेवारी 2027पर्यंत तो बाहेर राहतो का? जानेवारी२०२७ची सकाळ मातोश्रीमध्ये बघतो का? याच्याबद्दल संजय राऊतांनी पहिले चिंता करावी असा सल्लाच नियतष राणेंनी संजय राऊतांना दिला.
 




गायत्री श्रीगोंदेकर

मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.
संबंधित मजकूर