मुंबई : (Bhagwan Patil Appointed CEO)एअर कॉर्पोरेशन एम्प्लॉईज (एस) को-ऑपरेटिव्ह बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी भगवान पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. बँकेचे अध्यक्ष राजेश भागवत, उपाध्यक्ष निलेश लांजेकर यांनी भगवान पाटील यांचे स्वागत केले. याप्रसंगी उमेश सानप, ऋषिकेश बांडुक, शाम खवळे, संदीप जाधव, संदीप मोरे आदी संचालक तसेच कमर्चारी प्रतिनिधी राजेंद्र पारकर, सुचिता म्हात्रे आणि वरिष्ठ व्यवस्थापिका वर्षा पटेल उपस्थित होते.
भगवान पाटील हे बी.ई. (केमिकल), एम.एम.एस. (फायनान्स), एल.एल.एम., CAIIB तसेच GDCA अशा विविध शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता धारण करतात. त्यांना बँकिंग क्षेत्रातील २३ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव आहे. एअर कॉर्पोरेशन एम्पलॉई को-ऑपरेटिव्ह बँकेच्या मुंबईत सध्या चार शाखा कार्यरत असून, ही बँक प्रामुख्याने पगारदार कर्मचारी वर्गाच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी कार्यरत आहे.( Bhagwan Patil Appointed CEO)
एस बँकेची स्थापना दि. १६ ऑगस्ट १९५२ साली झाली. बँकेने ७४ वर्ष पूर्ण केली असून बँक आपला अमृत महोत्सव साजरा करीत आहे. बँकेच्या कार्यक्षमतेची दखल घेत महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँक्स फेडरेशनतर्फे सन २०२५-२६ साठी ‘पगारदार बँक’ या श्रेणीत प्रथम पुरस्कार बँकेला प्राप्त झाला आहे. तसेच बृहन्मुंबई नागरी सहकारी बँक असोसिएशने सन २०२५-२६ साठी पगारदार श्रेणीतील उत्कृष्ट बँक पुरस्कार देऊन गौरविले आहे.( Bhagwan Patil Appointed CEO)
'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक