दसऱ्यानिमित्त वाड्यातील बाजारपेठा झेंडूच्या माळांनी फुलल्या; चांगला भाव मिळताच शेतकरी बनले विक्रेते

    20-Oct-2026


Wada Marigold Flower Market

वाडा : (Wada Marigold Flower Market) वाडा तालुक्यातील सर्वच मुख्य बाजारपेठा दसरा सणानिमित्ताने झेंडूच्या माळा व फुलांनी फुलून गेल्या होत्या. झेंडूंच्या फुलांचे उत्पादन घेणारे परिसरातील शेतकरी यावेळी स्थानिक बाजारपेठेत येऊन झेंडूच्या फुलांची प्रत्यक्ष विक्री करीत असताना दिसून आले. या वर्षी कुडूस, वाडा, खानिवली व शिरीषफाटा या स्थानिक बाजारपेठेत झेंडूंच्या फुलांना चांगला भाव मिळत असल्याने विक्रीसाठी शेतकरीच विक्रेता बनला असल्याचे दिसत होते.
 
दसरा हा सण हिंदू धर्मातील सर्वात महत्त्वाचा सण असून साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त असणाऱ्या य सणाचे अनेक अर्थाने महत्त्व आहे.अधर्मावर धरमाचा, असत्यावर सत्याचा, अन्यायावर न्यायाचा आणि अंधारावर प्रकाशाचा विजय साजरा करणारा सण म्हणजे दसरा होय.इतर फुलांपेक्षा झेंडूच्या फुलाचे धार्मिक महत्त्व अधिक आहे. झेंडूच्या फुलाचा रंग विजय, हर्ष आणि उत्साहाचे प्रतीक मानले जाते. म्हणून या सणाला झेंडूच्या फुलांनी शस्त्र पूजा, वापरातील यंत्र, वाहणे, प्रवेशद्वार आदी ठिकाणी सजावट केली जाते. सजावट व पूजेसाठी हे फुल वापरण्याची वर्षांनुवर्षांची परंपरा आहे. त्यामुळे झेंडूच्या फुलांना या दिवशी मोठी मागणी असल्याने बाजारपेठा अक्षरशः फुलून गेल्या होत्या. या वर्षी झेंडूच्या फुलांना प्रति किलो १०० ते १३० रुपये असा चांगला भाव मिळत असल्याची माहीती फुल विक्रेत्यांनी दिली.(Wada Marigold Flower Market)
 




संबंधित मजकूर