ठाणे कोस्टल रोडच्या कामाला वेग; एका दिवसात १० आय-गर्डर्स उभारण्याचा विक्रम!

खारेगाव-गायमुख टप्प्याचे ४५ टक्के काम पूर्ण; डिसेंबर २०२८ पर्यंत मार्ग वाहतुकीसाठी खुला करण्याचे एमएमआरडीएचे नियोजन


Thane Coastal Road Project

मुंबई, : (Thane Coastal Road Project)ठाण्यातील घोडबंदर रोडवरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) हाती घेतलेल्या ठाणे कोस्टल रोड प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात महत्त्वपूर्ण प्रगती नोंदवण्यात आली आहे. या प्रकल्पांतर्गत १४ ऑक्टोबर २०२६ रोजी एकाच दिवसात १० आय-गर्डर्सची उभारणी करण्यात आली.
 
सर्वसाधारणपणे एका दिवसात चार ते सहा गर्डर्सची उभारणी केली जाते. त्या तुलनेत एकाच दिवसात दहा गर्डर्स उभारण्याची कामगिरी या प्रकल्पासाठी महत्त्वपूर्ण ठरली आहे. या कामगिरीमुळे प्रकल्पाच्या बांधकामाला गती मिळाली असून, खारेगाव-गायमुख टप्प्याचे एकूण ४५ टक्के काम पूर्ण झाले आहे.(Thane Coastal Road Project)
 
ठाणे शहरातील घोडबंदर रोडवर सातत्याने होणारी वाहतूक कोंडी तसेच पूर्व द्रुतगती महामार्गावरील वाढता वाहतुकीचा ताण कमी करण्याच्या उद्देशाने एमएमआरडीएने ठाणे खाडी किनारा मार्ग प्रकल्प हाती घेतला आहे. या प्रकल्पाचे काम दोन टप्प्यांत करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात खारेगाव ते गायमुख, तर दुसऱ्या टप्प्यात आनंदनगर ते बाळकुम या मार्गाचा समावेश आहे. सध्या पहिल्या टप्प्याचे काम वेगाने सुरू असून, दुसऱ्या टप्प्यासाठी आवश्यक परवानग्या मिळवण्याची प्रक्रिया सुरू आहे.
 
खारेगाव टोलनाका ते गायमुख यांना जोडणारा पहिला टप्पा १३.४५ किलोमीटर लांबीचा असून, हा सहा पदरी आणि प्रवेश-नियंत्रित मार्ग असणार आहे. या मार्गामुळे घोडबंदर रोडवरील वाहतुकीचा ताण कमी होण्यास मदत होणार आहे. तसेच मुंबई-नाशिक महामार्ग आणि गायमुख परिसरातील जोडणी अधिक सक्षम होऊन वाहनचालकांना पर्यायी मार्ग उपलब्ध होईल.(Thane Coastal Road Project)
 
प्रकल्पाच्या बांधकामांतर्गत सध्या गर्डर उभारणीचे काम प्रगतिपथावर आहे. १४ ऑक्टोबर रोजी एमएमआरडीएचे अधिकारी, अभियंते आणि कामगारांच्या पथकाने नियोजनबद्ध पद्धतीने एका दिवसात १० आय-गर्डर्सची उभारणी पूर्ण केली. या कामगिरीमुळे बांधकामाच्या वेळेचे नियोजन आणि प्रकल्पाच्या अंमलबजावणीला गती देण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा टप्पा गाठण्यात आला आहे.
 
एमएमआरडीएने पहिल्या टप्प्याचे काम डिसेंबर २०२८ अखेर पूर्ण करून हा मार्ग वाहतुकीसाठी खुला करण्याचे नियोजन केले आहे. त्यामुळे ठाणे आणि घोडबंदर परिसरातील वाहतूक व्यवस्थेत सुधारणा होण्याची अपेक्षा आहे. दुसऱ्या टप्प्याचे काम आवश्यक परवानग्या मिळाल्यानंतर सुरू होणार असून, संपूर्ण प्रकल्पामुळे ठाणे शहरातील प्रमुख मार्गांवरील वाहतुकीचा भार कमी करण्यास मदत होऊ शकते.(Thane Coastal Road Project)
 




गायत्री श्रीगोंदेकर

मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.
संबंधित मजकूर