ढाका (Sheikh Hasina Bangladesh Return December) : बांगलादेशच्या माजी पंतप्रधान आणि अवामी लीगच्या नेत्या शेख हसीना यांनी डिसेंबरमध्ये मायदेशी परतण्याचा निर्धार पुन्हा व्यक्त केला आहे. बांगलादेशातील सध्याच्या सरकारकडून अटक, छळ किंवा जीवाला धोका निर्माण झाला, तरीही आपण परतणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. २०२४ मध्ये सत्तांतर झाल्यानंतर बांगलादेश सोडून भारतात आलेल्या हसीना यांनी समर्थकांच्या पाठीशी उभे राहणे ही आपली राजकीय जबाबदारी असल्याचे स्पष्ट केले.
अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टन येथून आयोजित पत्रकार परिषदेत व्हर्च्युअल माध्यमातून बोलताना हसीना यांनी मायदेशी परतण्याबाबत ठाम भूमिका मांडली. मात्र, परतीची नेमकी तारीख त्यांनी जाहीर केलेली नाही. (Sheikh Hasina Bangladesh Return December)
“मी डिसेंबरमध्ये बांगलादेशात परतणार आहे. मला भीती वाटत नाही. ते मला ठार मारू शकतात, अटक करू शकतात किंवा छळ करू शकतात, याची मला जाणीव आहे. तरीही परत जाणे ही माझी जबाबदारी आहे,” असे हसीना म्हणाल्या.
“परत जाणे किती धोकादायक आहे, याची मला पर्वा नाही. मला परत जावेच लागेल,” असेही त्यांनी स्पष्ट केले. (Sheikh Hasina Bangladesh Return December)
दरम्यान, त्यांचे पुत्र सजीब वाजेद जॉय यांनी पत्रकारांशी बोलताना परतीची तारीख अद्याप निश्चित झालेली नसल्याचे सांगितले. योग्य वेळ जवळ आल्यावर याबाबत घोषणा केली जाईल, असे त्यांनी नमूद केले. (Sheikh Hasina Bangladesh Return December)
भारताचे मानले आभार
सत्तेवरून पायउतार झाल्यानंतर शेख हसीना भारतात वास्तव्यास आहेत. संकटाच्या काळात भारताने आपले स्वागत करून आश्रय दिल्याबद्दल त्यांनी भारत सरकार आणि भारतीय जनतेचे आभार मानले. (Sheikh Hasina Bangladesh Return December)
“भारत सरकार आणि सर्व पक्षांतील लोकांचे आभार. त्यांनी १९७५ मध्ये जसे माझे स्वागत केले होते, तसेच यावेळीही केले,” असे हसीना म्हणाल्या.
१९७५ मध्ये त्यांचे वडील आणि बांगलादेशचे संस्थापक नेते शेख मुजीबुर रहमान यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील अनेक सदस्यांची हत्या करण्यात आली होती. त्यावेळी भारताने शेख हसीना आणि त्यांच्या बहिणीचा जीव वाचला होता. (Sheikh Hasina Bangladesh Return December)
यापूर्वीही संकटाच्या काळात मायदेशी परतल्या
राजकीय संकटे आणि सुरक्षेचे धोके असूनही आपण यापूर्वी बांगलादेशात परतल्याचे हसीना यांनी सांगितले. १९७५ मधील हत्याकांडानंतर अनेक वर्षे परदेशात राहिल्यानंतर त्या १९८१ मध्ये बांगलादेशात परतल्या होत्या. तसेच, २००७ मध्ये देशात राजकीय आणीबाणीची परिस्थिती असताना आणि आपल्याविरोधात कायदेशीर कारवाया सुरू असतानाही मायदेशी परतण्याचा निर्णय घेतल्याची आठवण त्यांनी करून दिली. (Sheikh Hasina Bangladesh Return December)
निष्पक्ष न्यायप्रक्रियेची मागणी
शेख हसीना यांनी पंतप्रधान तारिक रहमान यांच्या नेतृत्वाखालील बांगलादेशच्या सध्याच्या राजकीय परिस्थितीवर टीका करत आपल्याविरोधात आणि अवामी लीगच्या सदस्यांविरोधात सुरू असलेल्या कायदेशीर कारवायांवर प्रश्न उपस्थित केले. या कारवायांचा वापर राजकीय विरोधकांना दडपण्यासाठी केला जात असल्याचा आरोप त्यांनी केला. (Sheikh Hasina Bangladesh Return December)
राजकीय नेत्यांविरोधातील आरोपांवरील निर्णय निष्पक्ष न्यायप्रक्रियेद्वारे व्हायला हवा, असे त्यांनी म्हटले. बांगलादेशचे भविष्य तेथील नागरिकांनी मुक्त आणि सर्वसमावेशक लोकशाही प्रक्रियेद्वारे ठरवावे, असे आवाहनही त्यांनी केले.(Sheikh Hasina Bangladesh Return December)
स्वतंत्र न्यायालये, अभिव्यक्तिस्वातंत्र्य, राजकीय संघटनांचे स्वातंत्र्य, अल्पसंख्याकांचे संरक्षण आणि कायद्याचा आदर या बाबींवर त्यांनी भर दिला. राजकीय पक्षांना लोकशाही प्रक्रियेत सहभागी होण्यापासून रोखल्यास देशातील मतभेद वाढू शकतात आणि राष्ट्रीय सलोख्याला बाधा पोहोचू शकते, असा इशाराही त्यांनी दिला.
“माझ्या सरकारला विरोध करणारे लोकही या देशाचे नागरिक आहेत आणि त्यांच्या अधिकारांचा आदर केला गेला पाहिजे. बांगलादेशचे भविष्य सूडावर नव्हे, तर सलोख्यावर आधारित असले पाहिजे,” असे हसीना म्हणाल्या. (Sheikh Hasina Bangladesh Return December)
२०२४ मधील आंदोलनांबाबतही भाष्य
२०२४ मधील आंदोलनांदरम्यान आणि त्यानंतर घडलेल्या घटनांमध्ये आपल्या सरकारच्या भूमिकेबाबत कठीण प्रश्न उपस्थित होत असल्याचे हसीना यांनी मान्य केले. आपल्यासह कोणत्याही व्यक्तीविरोधातील आरोपांची पारदर्शक आणि निष्पक्ष कायदेशीर प्रक्रियेद्वारे चौकशी होणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
त्यामुळे डिसेंबरमध्ये शेख हसीना खरोखरच बांगलादेशात परतणार का, तसेच त्यांच्या संभाव्य पुनरागमनाचा देशाच्या राजकारणावर काय परिणाम होणार, याकडे आता लक्ष लागले आहे. (Sheikh Hasina Bangladesh Return December)
Hello, You must be familiar with the Nation First approach daily 'Mumbai Tarun Bharat' as a newspaper committed to fearless and nationalist ideals and constantly doing conscious journalism for it. The journey of four decades has been successful only because of your trust and cooperation. Dear readers, we have been making a successful effort to always be perfect in our commitment to the thoughts of the nation and the national interest...
Changing with time is essential for any organization. Daily 'Mumbai Tarun Bharat' has decided to take this role here too and make 'MahaMTB' available in the media for the new 'smart' generation. Today's youth, readers, and citizens are becoming more and more 'smart' day by day. And in today's 'smart' era, information is available in abundance in the Internet-enabled information explosion. However, there is a need for complementary knowledge to determine a modern role and approach that is compatible with culture, motionlessness and tradition.
That is why mahamtb.com, MahaMTB Mobile App', MahaMTB Youtube Channel, MahaMTB Facebook Page, MahaMTB Twitter, MahaMTB Instagram, MahaMTB Telegram, MahaMTB WhatsApp Group etc. through social media and advanced avatar content. We are coming before you. Role in the new era, 'smart' journalism with a view, 'smart' multimedia for the new era, and journalism for a 'smart' Maharashtra will be the side of the game.