दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर राज्यात ‘शेत वाचवा अभियान’

    20-Oct-2026   

Save Farms Campaign Maharashtra 
 
 
मुंबई, : (Save Farms Campaign Maharashtra)राज्यात दुष्काळाने शेतीचे गणितच बदलले असून, पाण्याची उपलब्धता लक्षात घेऊन पीकपद्धतीत बदल करण्याचे आव्हान शेतकऱ्यांसमोर उभे राहिले आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्रीय कृषी विभागाने ‘शेत वाचवा अभियान’ सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यातही दि. २२ ऑक्टोबर ते ३० नोव्हेंबरदरम्यानच्या हे अभियान चालणार असून यात पाण्याची मोठी गरज असलेल्या पिकांना पर्याय देण्यापासून ते जमिनीचे आरोग्य आणि जलसंधारणापर्यंत विविध उपायांवर भर दिला जाणार आहे.
 
राज्यातील ३०५ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला असून दुष्काळी उपाययोजना लागू करण्यात आल्या आहेत. अशावेळी ऊसासारखी पाणीदार पिके टाळून कमी पाण्यात येणारी पिके, जमिनीचे आरोग्य सुधारणे, खतांचा संतुलित वापर आणि जलसंधारण यावर भर दिला जाणार आहे.(Save Farms Campaign Maharashtra)
 
तेलबिया, कडधान्ये आणि ज्वारीला प्रोत्साहन
 
दुष्काळी परिस्थितीत शेती टिकवण्यासाठी पीकपद्धतीत बदल करण्यावर कृषी विभागाचा भर राहणार आहे. पाण्याची मोठ्या प्रमाणात गरज असलेल्या पिकांऐवजी स्थानिक हवामान, जमिनीचा प्रकार आणि उपलब्ध पाण्यानुसार पीक निवडण्याचा सल्ला शेतकऱ्यांना दिला जाणार आहे. यामध्ये तेलबिया आणि कडधान्यांना प्राधान्य देतानाच पाण्याची उपलब्धता असलेल्या भागात ज्वारीची लागवड वाढविण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. प्रतिकूल हवामानामुळे उत्पादनावर परिणाम झाला तरी ज्वारीचा उपयोग पशुधनासाठी चारा म्हणून करता येत असल्याने ती शेतकऱ्यांसाठी दुहेरी उपयोगाची ठरू शकते.
 
मराठवाडा, विदर्भ तसेच पश्चिम महाराष्ट्रातील काही भागांमध्ये पावसाची अनिश्चितता आणि सातत्याने खालावत असलेली भूजलपातळी यामुळे शेतीचे संकट अधिक गडद झाले आहे. प्राथमिक पीक कापणीच्या अहवालांमधून अनेक भागांत उत्पादनात मोठी घट होण्याची चिन्हे दिसत आहेत.(Save Farms Campaign Maharashtra)
 
कमी पाण्यात अधिक उत्पादनाचे नियोजन
 
शेतातील उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करण्याबरोबरच उत्पादन खर्चावर नियंत्रण ठेवण्याचेही अभियानाचे उद्दिष्ट आहे. भात कापणीनंतर शेत रिकामे न ठेवता त्याचा योग्य पद्धतीने वापर, पीक अवशेषांचा शास्त्रोक्त निपटारा, एकात्मिक कीड व्यवस्थापन आणि ठिबक व तुषार सिंचनाचा अवलंब याबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले जाणार आहे. कमी पाण्यात अधिक उत्पादन घेण्यासाठी ‘प्रति थेंब अधिक पीक’ या संकल्पनेनुसार सूक्ष्म सिंचनाचा वापर वाढविण्यावर विशेष भर दिला जाणार आहे.(Save Farms Campaign Maharashtra)
 
“शेतीचा उत्पादन खर्च कमी करण्यासोबतच जमिनीची सुपीकता टिकवणे आणि शेती अधिक शाश्वत बनवणे आवश्यक आहे. माती परीक्षणावर आधारित खतांचा संतुलित वापर, जलसंधारण, पीक विविधीकरण आणि नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देऊन जमिनीचे आरोग्य जपण्यासाठी ‘खेत बचाओ अभियान’ प्रभावीपणे राबविण्यात येणार आहे. राज्यातील सर्व शेतकरी बांधवांनी आपल्या जिल्ह्यातील कृषी कार्यालय, कृषी विज्ञान केंद्र किंवा आत्मा कार्यालयाशी संपर्क साधून या अभियानात सक्रिय घ्यावा, असे सर्वांना आवाहन करतो.”(Save Farms Campaign Maharashtra)
- कृषीमंत्री दत्तात्रय भरणे
 
 




अवंती भोयर

विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....
संबंधित मजकूर