_202610201633424625_H@@IGHT_350_W@@IDTH_696.jpg)
मुंबई,: (Samsung Diwali Offers 2026) या सणासुदीच्या आणि दिवाळीच्या शुभमुहूर्तावर सॅमसंग इंडियाने ग्राहकांचे दैनंदिन जीवन अधिक सोयीस्कर, आधुनिक आणि कनेक्टेड बनवण्यासाठी आपल्या होम अप्लायन्सेसच्या विस्तृत श्रेणीवर विशेष ऑफर्स जाहीर केल्या आहेत. ग्राहकांना उत्तम फायदे आणि लवचिक फायनान्सिंग पर्यायांसह अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अनुभव घेता यावा, या उद्देशाने या फेस्टिव्ह ऑफर्स सादर करण्यात आल्या आहेत.
या फेस्टिव्ह ऑफरचा भाग म्हणून ग्राहक निवडक सॅमसंग उत्पादनांवर २०,००० रुपयांपर्यंतच्या कॅशबॅकचा लाभ घेऊ शकतात. तसेच, सॅमसंग फायनान्स+ द्वारे फक्त ८८८ रुपयांपासून सुरू होणारे सुलभ ईएमआय, शून्य डाऊन पेमेंट आणि सुलभ फायनान्सिंग पर्याय उपलब्ध करून देण्यात आले आहेत. सणासुदीचा आनंद अधिक द्विगुणित करण्यासाठी सॅमसंगने आयडीएफसी फर्स्ट बँक, एचडीबी फायनान्शियल सर्व्हिसेस आणि टीव्हीएस क्रेडिट यांच्या सहयोगाने 'ट्रिपल झिरो ऑफर' जाहीर केली आहे. याअंतर्गत ६ ते १० महिन्यांच्या मुदतीसाठी शून्य डाऊन पेमेंट, शून्य प्रोसेसिंग फी आणि शून्य व्याजदरावर बीस्पोक एआय डिजिटल अप्लायन्सेस खरेदी करता येतील. ग्राहकांच्या दीर्घकालीन सुरक्षेसाठी सॅमसंग केअर+ अंतर्गत १ वर्षाची वॉरंटी खरेदी केल्यास कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय ३ वर्षांपर्यंत अतिरिक्त वॉरंटी देखील मिळत आहे.(Samsung Diwali Offers 2026)
सॅमसंगच्या बीस्पोक एआय अप्लायन्सेसमध्ये भारतीय कुटुंबांसाठी अत्यंत वैयक्तिकृत, ऊर्जा-कार्यक्षम आणि सुरक्षित स्मार्ट होम सोल्यूशन्स देण्यात आले आहेत. सॅमसंगच्या फॅमिली हब रेफ्रिजरेटरमध्ये आता जनरेटिव्ह एआयचा समावेश करण्यात आला असून, यामुळे प्रक्रिया केलेल्या अन्नपदार्थांसह विविध साहित्याची ओळख पटवणे सोपे झाले आहे. यातील 'एआय फूड मॅनेजर' फ्रिजमधील साहित्याची रिअल-टाइम माहिती ठेवतो. तसेच 'स्मार्टथिंग्स फूड'द्वारे रेसिपीच्या सूचना, स्वयंपाकाचे टप्प्याटप्प्याने मार्गदर्शन, एक्सपायरी डेट्सचे व्यवस्थापन आणि बिक्सबीद्वारे खरेदीच्या याद्या तयार ठेवण्यास मदत होते. याशिवाय, एंटरप्राइझ-दर्जाचे 'नॉक्स सिक्युरिटी' डेटा संरक्षण आणि 'स्मार्टथिंग्स कनेक्टिव्हिटी'मुळे घरातील सर्व उपकरणांवर सहजरीत्या नियंत्रण ठेवता येते.
या उपक्रमाबाबत बोलताना सॅमसंग इंडियाच्या डिजिटल अप्लायन्सेस बिझनेसचे उपाध्यक्ष व प्रमुख गुफरान आलम म्हणाले, “सॅमसंगची २०२६ बीस्पोक एआय अप्लायन्स श्रेणी ट्रु होम कंपॅनियन ठरावी अशा रीतीने डिझाइन करण्यात आली आहे, ज्यामुळे ग्राहकांना त्यांचे दैनंदिन व्यवहार सोपे करणे आणि अधिक वैयक्तिकृत अनुभव मिळवणे शक्य होईल. आमच्या बीस्पोक एआय अप्लायन्सेसवरील या आकर्षक ऑफर्सच्या माध्यमातून आम्ही यंदा दिवाळीचा सण अधिक खास बनवू इच्छितो.”(Samsung Diwali Offers 2026)
ही विशेष ऑफर १५ नोव्हेंबर २०२६ पर्यंत सॅमसंग डॉटकॉम, प्रमुख ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म्स आणि देशभरातील सर्व रिटेल स्टोअर्समध्ये उपलब्ध राहील.