मुंबई (Salman Khan Big Boss ) : बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफ यांच्या गाडीवर झालेल्या गोळीबाराच्या घटनेने चित्रपटसृष्टीतील कलाकारांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. या घटनेनंतर अभिनेता सलमान खानच्या ‘बिग बॉस २०’ या लोकप्रिय शोबाबतही महत्त्वाची घडामोड समोर आली आहे. सलमान खान आगामी ‘वीकेंड का वार’ भागाचे सूत्रसंचालन करणार नसून, त्याच्या जागी दिग्दर्शक रोहित शेट्टी सूत्रसंचालनाची जबाबदारी सांभाळणार आहेत.
लॉरेन्स बिश्नोई आणि सलमान खान यांच्यात गेल्या कित्येक वर्षांपासून वाद सुरू आहे. लॉरेन्स बिश्नोई टोळीने अनेक वेळा सलमान खान यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याचे आरोप आहेत. एवढेच नव्हे, तर सलमान खान यांच्या जवळच्या व्यक्तींनाही लक्ष्य करण्यात आले आहे. (Salman Khan Big Boss )
सलमान खानने स्वतः केली घोषणा
‘बिग बॉस २०’च्या दि. १८ ऑक्टोबर रोजी प्रसारित झालेल्या भागात सलमान खानने आगामी ‘वीकेंड का वार’मध्ये आपण उपस्थित राहणार नसल्याचे स्पष्ट केले. त्याच्या अनुपस्थितीत रोहित शेट्टी शोचे सूत्रसंचालन करणार असल्याची माहितीही त्याने दिली.
माध्यमांच्या वृत्तानुसार, सलमानने या निर्णयामागे आधीपासून निश्चित असलेल्या व्यावसायिक कामाचे कारण दिले आहे. (Salman Khan Big Boss )
टायगर श्रॉफवरील गोळीबारानंतर बॉलिवूडमध्ये चिंतेचे वातावरण
१८ ऑक्टोबर रोजी मुंबईतील जुहू परिसरात टायगर श्रॉफ यांच्या गाडीवर गोळीबार झाल्याची घटना घडली. या घटनेत टायगर सुरक्षित राहिले; मात्र त्यांच्या चालकासह दोघे जखमी झाल्याचे वृत्त आहे. या प्रकरणात तीन संशयितांना ताब्यात घेण्यात आले असून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
दरम्यान, या घटनेनंतर सलमान खानसह काही बॉलिवूड कलाकारांच्या सुरक्षेबाबतही चिंता व्यक्त केली जात आहे. (Salman Khan Big Boss )