जातीपातीच्या भिंती तोडून दुष्काळात एकजूटीने काम करा! दसरा मेळाव्यातून मंत्री पंकजा मुंडे यांचे आवाहन

    20-Oct-2026   
 
Pankaja Munde Dussehra Rally
 
बीड, : (Pankaja Munde Dussehra Rally)राज्यात असलेल्या दुष्काळाच्या संकटात सर्वांनी जाती पातीच्या भिंती तोडून एकजूटीने काम करा, असे आवाहन पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी केले. विजयादशमीच्या दिवशी मंत्री बीड जिल्ह्यातील भगवान गडावर पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा पार पडला. यावेळी त्या बोलत होत्या.
 
दसरा मेळाव्यात भाषण सुरू होण्यापूर्वी पंकजा मुंडे यांनी मेळाव्याला उपस्थित असलेल्या लोकांची नजर काढली. त्यांच्या या कृतीचा व्हिडिओ मेळाव्यादरम्यान पाहायला मिळाला. यावेळी बोलताना मंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या की, "दुष्काळाच्या काळात पर्यावरण मंत्री म्हणून सीएसआर निधीतून प्रत्येक गावात पिण्याचे पाणी पोहोचवण्यासाठी, गुरांसाठी चारा पोहोचवण्यासाठी आणि शेतकऱ्यांना अनुदान मिळण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत काम करून या दुष्काळाची सावली बनण्याचे काम मी करेन. फक्त आपल्याला जाती पातीच्या भिंती तोडून एकजूटीने काम करायचे आहे."(Pankaja Munde Dussehra Rally)
 
माणसामाणसांत भिंत उभी करायची नाही
 
त्या पुढे म्हणाल्या की, "हे सीमोल्लंघनाचे आगळेवेगळे दशक आहे. ज्यांच्या मनात देशाबद्दल आदर नाही, स्वत:चे घर आणि देश जाळून आंदोलन करणारी तरुण पिढी आपल्याला आपल्या देशात नको आहे. देशाला पुढे नेण्यासाठी जयप्रकाश नारायण यांच्या चळवळीत रक्तात देशभक्ती भिनलेले गोपीनाथ मुंडे यांच्यासारखे सैनिक पाहिजेत. जेन झींचे नेतृत्व मुद्दावरून होईल, गुद्दावर जाऊन ते करता येणार नाही. आज दुष्काळाची परिस्थिती आहे. आपल्याला अनेक भींती मोडायच्या आहेत. काळा आणि गोरा कारभार, उजेड आणि अंधकार यात आपल्याला भिंती उभ्या करायच्या आहेत. आपल्याला माणसामाणसांत भिंत उभी करायची नाही. धर्म आणि जातीच्या भिंती मनगटाने मोडून काढायच्या आहेत. संकट आल्यावर जातीच्या भिंती चुटकीसरशी तुटून जातात. गरीबावर आणि श्रीमंतावर वेगळा दुष्काळ येत नाही. दुष्काळात जाती धर्माच्या भिंती तोडून काढायच्या आहेत."(Pankaja Munde Dussehra Rally)
 
"मी जालन्यातील अंतरवाली सराटी दत्तक घेतले असून तिथला विकास करणार आहे. बीड जिल्ह्यातील प्रत्येक जिल्ह्याएवढेच तिथेही प्रेम करणार आहे. मला प्रेमाचा प्रसार करायचा आहे. जातीपातीच्या जीवावर मोठे होऊ पाहणाऱ्यांना भविष्य नाही. एखादा प्रशिक्षित माणूसच देशाला जागतिक सत्ता बनवू शकतो," असेही मंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या.(Pankaja Munde Dussehra Rally)
 
 




अवंती भोयर

विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....
संबंधित मजकूर