‘गुन्हेगारांना वाचवण्यात महाविकास आघाडीची पीएचडी’ : मंत्री नितेश राणे

मंत्री नितेश राणेंकडून काँग्रेस आणि विरोधकांची कान उघडणी; सुशांत सिंह राजपूत, दिशा सालियन प्रकरणांचाही उल्लेख


Nitesh Rane Targets MVA

 
 
मुंबई,: (Nitesh Rane Targets MVA)अभिनेता टायगर श्रॉफशी संबंधित गोळीबाराच्या घटनेवरून मंत्री नितेश राणे यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांवर जोरदार टीका केली. मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये पोलिसांकडून गुन्ह्यांचा तपास तत्परतेने केला जात असल्याचे सांगत त्यांनी महाविकास आघाडीच्या काळातील कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित केले. यावेळी त्यांनी खा.संजय राऊत, खा.सुप्रिया सुळे आणि काँग्रेसच्या नेत्यांवरही निशाणा साधला.
 
गोळीबाराच्या घटनेनंतर शूटरचा शोध घेण्यासाठी पोलिसांची १२ पथके रवाना करण्यात आली असून, राजस्थान आणि महाराष्ट्रातून काही जणांना ताब्यात घेण्यात आल्याचेही नितेश राणे यांनी सांगितले. या कारवाईचा संदर्भ देत त्यांनी महाविकास आघाडीच्या काळात गुन्हेगारांना संरक्षण दिले जात असल्याचा आरोप केला.(Nitesh Rane Targets MVA)
 
राणे म्हणाले, “टायगर श्रॉफवर गोळीबार झाल्यावर महाविकास आघाडीची सगळी बेडकं बाहेर येऊन फार डराव डराव करायला लागलेली आहे. स्वतःचे महाविकास आघाडीच्या काळात केलेले सगळे कारनामे पराक्रम कदाचित हे सगळे नेते मंडळी विसरले असतील. टायगर श्रॉफवर गोळीबार झाला. त्यानंतर बारा टीम त्या शुटरला शोधण्यासाठी निघाल्या आहेत. त्याच्यातील काही शुटरना पकडलेले पण आहे. राजस्थान आणि महाराष्ट्रटातून काही लोकांना पकडलेले आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या काळात अशा कुठल्याही घटना घडल्यानंतर अत्यंत तत्परतेने पोलीस खाते काम करते.” 
ते पुढे म्हणाले, “त्याच्या पाच टक्के तरी महाविकास आघाडीच्या काळात व्हायचं का? म्हणजे कारवाई करणं, आणि तपास करणे ही लांबची गोष्ट आहे. मात्र गुन्हेगारांना वाचवण्यात महाविकास आघाडीच्या सरकारने पीएचडी केलेली होती.”
 
सुशांत सिंह राजपूत आणि दिशा सालियन यांच्या मृत्यूच्या प्रकरणांचा उल्लेख करत राणे यांनी संजय राऊत आणि ठाकरे कुटुंबावर जोरदार निशाणा साधला. या प्रकरणांमध्ये लपवाछपवी झाल्याचा दावा करत त्यांनी तत्कालीन ठाकरे सरकारच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले.(Nitesh Rane Targets MVA)
 
राणे म्हणाले, “संजय राजाराम राऊतने स्वतःच्या मालकाच्या अंगावर जे सुशांत सिंग आणि दिशा सालियनच्या खुनाचे भरवटलेले रक्ताने भरवटलेले जे कपडे आहेत ते पहिले साफ करावे. स्वतःच्या मालकावर आणि त्याच्या मुलावर खून आणि बलात्कारचे आरोप आहेत. सुशांत सिंग राजपूत आणि दिशा सालियन यांच्या वडिलांनी केलेले आहेत हे आरोप. महाविकास आघाडीच्या काळात मनसुख हिरेनचे हत्याकांड होते. मोठ्या उद्योगपतींच्या घराच्या बाहेर जिलेटिनच्या काड्या ठेवल्या जातात. सुशांत सिंगचा खून होतो. दिशा सालियनचा खून आणि गॅंग रेप होतो. स्वतःचे तेव्हा मुख्यमंत्री असलेले उद्धव ठाकरे आणि स्वतःचा मुलगा जो तेव्हा कॅबिनेट मंत्री पण होता त्याचं नाव त्या खून प्रकरणात येते आणि मग त्याला वाचवण्यासाठी. किती मोठा कव्हर अप झाला. या गोष्टी आमच्या देवेंद्र फडणवीस यांच्या राज्यात होत नाही. कोण हे करण्याची हिम्मत करत नाही. जिथे आज जर कुठेही क्राईम घडले की लगेच पोलीस ऍक्शन मोडमध्ये जातात. तुमच्यासारखे लपवा लपवी करायला जात नाही.”
 
राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांना उद्देशून त्यांनी तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अटकेचा संदर्भ दिला. राणे म्हणाले, “सुप्रिया ताईंना थोडं आठवण करून देईन. तुमच्या महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये राष्ट्रवादीचा गृहमंत्री होता. ज्याला अटक झाली आणि जेलमध्ये जायला लागले."(Nitesh Rane Targets MVA)
 
मुंबईतील १९९० च्या दशकातील गुन्हेगारीचा उल्लेख करत राणे यांनी तत्कालीन काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरकारवर गंभीर आरोप केले. दाऊद इब्राहिम आणि छोटा शकील यांच्याशी संबंधित कथित संबंधांचा उल्लेख करत त्यांनी संजय राऊत यांना आव्हान दिले.
 
राणे म्हणाले, “संजय राऊत याना कदाचित 1990 चा काळ कसा होता याचा विसर पडला आहे. तेव्हाच्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी सरकारमध्ये बसलेल्या लोकांनी काय काय केलेलं? मग काही रिपोर्ट आम्हाला पण बाहेर करायला लागतील." वोरा कमिटीच्या अहवालाचाही त्यांनी उल्लेख केला. “पण तेही ऐकण्याची हिम्मत ठेवा. वोरा कमिटीचा रिपोर्ट बाहेर काढू का? वोरा कमिटीच्या रिपोर्टमध्ये कुठल्या कुठल्या काँग्रेसवाल्यांचे नाव दाऊदशी लिंक झालेलं हे पण संजय राजाराम राऊतनी सांगावं.”
 
गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील कायदा-सुव्यवस्थेवर नियंत्रण ठेवल्याचा दावा करत राणे यांनी पुण्यातील एका अल्पवयीन मुलीवरील बलात्काराच्या प्रकरणाचा दाखला दिला. ते म्हणाले, “गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी राज्यामध्ये कायदा व सुव्यवस्थेवर अंकुश ठेवला आहे. पुण्याची एका चिमुकलीची बलात्काराची केस घडली. आरोपीला लगेच फाशीची शिक्षा ठोठावली गेली गेली. अशी शंभर तरी उदाहरणं मी तुम्हाला देऊ शकतो.”(Nitesh Rane Targets MVA)
 
महाराष्ट्राची बदनामी करण्यासाठी विरोधक प्रयत्न करत असल्याचे म्हणत नितेश राणे म्हणाले,"महाराष्ट्राचं बिहार काय असतं? आता बिहार आमच्या भारतीय जनता पक्षाकडे आहे. ते सुरक्षित आहे. लालू प्रसाद यादव होते तेव्हा बिहार असुरक्षित होतं. आता बिहार भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वात सुरक्षित आहे आणि महाराष्ट्रामध्ये क्राईम कन्व्हिक्शनच्या बाबतीत कधीतरी आमच्यावर बरोबर येऊन चर्चेला बसा.”
 
दिशा सालियन प्रकरणाचा पुन्हा उल्लेख करत राणे म्हणाले, “दिशा सालियन प्रकरणात लपवालपवी झाली. ती केस उघडली आहे आणि बघा तुमच्या मालकाचा मुलगा दिवाळीचे फटाके मातोश्रीवर फोडतो का? तिहाड, ऑर्थर रोडला फोडतो ते.”
केंद्र सरकारच्या नक्षलवादविरोधी कारवाईचाही त्यांनी उल्लेख केला. “केंद्र सरकारमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी देशातील नक्षलवाद पूर्ण संपवलेला आहे. आज नक्षलमुक्त भारतच्या दिशेने आपण चाललेलो आहे. मग त्यांना ह्या दोन चार लोकांना निपटवण्यामध्ये किती वेळ लागतोय? फक्त प्रत्येक गोष्टीची तारीख ठरलेली आहे. प्रत्येक गोष्टीची एक प्रक्रिया असते.”(Nitesh Rane Targets MVA)
 
काँग्रेसच्या नेतृत्वावर टीका करताना ते म्हणाले, “बोजा काय असतो जरा कर्नाटकमध्ये जाऊन बघा. बोजा करण्यामध्ये हर्षवर्धन सकपाळ यांनी पीएचडी केलेली आहे. असलेली काँग्रेस संपवण्याचे काम करत आहे."
जितेंद्र आव्हाड यांना आलेल्या धमकीच्या मेलवर प्रतिक्रिया देताना नितेश राणे म्हणाले," जितेंद्र आव्हाड यांना मुब्र्यातूनच धमकी आली असेल. फोन करून सांगण्याची पण गरज नाही. जितेंद्र आव्हाडला धमकी देण्यासाठी मुंब्र्याच्या बाहेर जायची गरजच नाही.”(Nitesh Rane Targets MVA)
 




गायत्री श्रीगोंदेकर

मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.
संबंधित मजकूर