‘नमो रमो नवरात्री’तून दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना लाखोंची मदत

सामाजिक बांधिलकी जपत मुख्यमंत्री सहाय्यता निधीत विविध घटकांचे योगदान

    20-Oct-2026   
 
(Namo Ramo Navratri)
 
डोंबिवली : (Namo Ramo Navratri)आदिशक्तीच्या उपासनेसोबतच सामाजिक कर्तव्याची जाणीव ठेवणं ही आपल्या संस्कृतीची मोठी परंपरा आहे. याचाच प्रत्यय सध्या 'नमो रमो नवरात्री’ उत्सवाच्या माध्यमातून येत असून, भक्तीसोबतच सेवाभावाची उत्तम भावना जपली जात आहे. महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त शेतकरी बांधवांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्यासाठी भाजप परिवारासह अनेक दानशूर व्यक्तींनी मदतीचा हात पुढे केला आहे. या अंतर्गत गोळा झालेला लाखो रुपयांचा निधी नुकताच मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाकडे सुपूर्द करण्यात आला.
 
संकटाच्या काळात बळीराजाला आधार देण्यासाठी लोकप्रतिनिधी, भाजप पदाधिकारी आणि स्थानिक उद्योजकांनी मोठ्या प्रमाणावर धनादेश सुपूर्द केले आहेत. एवढेच काय तर सामान्य नागरिक देखील शेतकरी बांधवांना मदतीचा हात देत आहे.(Namo Ramo Navratri)
 
- मदतीचा तपशील खालीलप्रमाणे:
 
• भाजपा ठाणे शहर (जिल्हाध्यक्ष संदीप लेले): ५,००,००० रुपये
• शामल गायकर (नगरसेवक, केडीएमसी): १,११,००० रुपये
• विनोद काळण (भाजपा नगरसेवक, केडीएमसी): ५१,००० रुपये
• हर्षदा भोईर (भाजपा नगरसेविका) व हृदयनाथ भोईर (माजी नगरसेवक): ५१,००० रुपये
• प्रतिक्षा पाटील: ५१,००० रुपये
• संजय मोरे (भाजपा कल्याण जिल्हा उपाध्यक्ष): २५,००० रुपये
• ओम रागाई नेटवर्क: २५,००० रुपये
• रामपाल पुरोहित: २५,००० रुपये
• मिहिर दवते: २१,००० रुपये
 
केवळ उत्सव साजरा न करता, समाजातील शेवटच्या घटकाला मदत करण्याचा हा उपक्रम अत्यंत कौतुकास्पद ठरत आहे. शेतकरी बांधवांना कठीण परिस्थितीत बळ देणारे हे एकवटलेले मदतीचे हात आपल्या संस्कृतीतील सेवाभाव पुन्हा एकदा अधोरेखित करतात.(Namo Ramo Navratri)
 




संबंधित मजकूर