विधानपरिषद निवडणूकीत महायुतीचा विजय निश्चित; मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

    20-Oct-2026   


Mahayuti Victory in MLC Election 2026

नागपूर  :(Mahayuti Victory in MLC Election 2026)महाराष्ट्रातील पाचही विधान परिषद जागांवर महायुतीचा विजय होईल. नागपूरला आम्ही ५० हजारांहून अधिक मतांनी जिंकू. सुधाकर कोहळे यांचा विजय मोठा असेल, असा विश्वास महसुलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला.
 
माध्यमांशी बोलताना मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, "२०२० मध्ये सत्तेचा गैरवापर करून आणि जातीपातीचे राजकारण करून संदीप जोशी यांना हरवण्याचे काम काँग्रेसने केले होते. उद्धव ठाकरे यांच्या सरकारमधील काही मंत्र्यांनी नागपूरमध्ये येऊन लोकांना धमकावून मते घेतली त्यामुळे आमची ही जागा गेली. पण आता सुधाकर कोहळे यांच्या माध्यमातून आपले प्रश्न सरकारपर्यंत पोहोचवता येतील आणि ते सोडवले जातील, अशी अपेक्षा पदवीधर मतदारांना आहे. त्यामुळे नागपूर पदवीधर मतदारसंघात महायुतीचे उमेदवार सुधाकर कोहळे विजयी होतील."(Mahayuti Victory in MLC Election 2026)
"अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत काँग्रेसचे काम केले नाही तर, नोकरीतून काढून टाकू अशा धमक्या संस्थाचालक शिक्षकांना देत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या असून या तक्रारींची चौकशी करण्यात येईल. मात्र, शिक्षकांनी धमकीला न घाबरता पारदर्शीपणे मतदान करावे. त्यांच्यावर कुणीही कारवाई करणार नाही. शिक्षकांवर अन्याय होऊ दिला जाणार नाही," असेही त्यांनी सांगितले.
 
शिवसेनेने बंडखोरांवर कारवाई करावी
 
"भाजपने सर्व बंडखोरांवर कारवाई केली आहे. आमचे सर्व नेते महायुतीच्या मागे उभे आहेत. मी स्वतः अमरावतीमध्ये प्रचार केला आहे. त्यामुळे अमरावती येथील शिवसेनेच्या उमेदवाराविरोधात निवडणूक लढवणाऱ्या बंडखोर उमेदवारावर पक्षाने कारवाई करण्यात यावी," अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.(Mahayuti Victory in MLC Election 2026)
 
राऊतांनी उंची बघून बोलावे
 
"मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत काँग्रेस नेते सुनील केदार यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केले असून यासंदर्भात मी पोलीस अधीक्षकांना माहिती दिली आहे. जामीनावर असलेल्या व्यक्तींनी राज्याच्या मुख्यमंत्र्यांबद्दल अशा पद्धतीने बोलणे योग्य नाही. तसेच संजय राऊत यांनीही आपली उंची बघून बोलावे. देवेंद्र फडणवीस हे देशातील पहिल्या १० नेतृत्वांपैकी महत्वाचे नेतृत्व आहे. पहिल्या पाच मुख्यमंत्र्यांपैकी ते एक आहेत. त्यांनी स्वत:ला सिद्ध केले आहे. त्यांना कोणाच्या प्रमाणपत्राची गरज नाही. राज्यातील जनतेने त्यांना स्वीकारले आहे. २८८ पैकी २३७ आमदारांचे सभागृह देवेंद्र फडणवीस यांचे आहे. बोलण्याचे स्वातंत्र्य आहे म्हणून सार्वजनिक जीवनात अशा पद्धतीने राज्याच्या मुख्यमंत्र्यांना किंवा देशाच्या पंतप्रधानांबद्दल वाईट पद्धतीने बोलणे योग्य नाही. जनता त्यांना योग्य धडा शिकवेल," असेही मंत्री बावनकुळे म्हणाले.
 
दुष्काळ निवारणासाठी सर्व विभागांचा निधी कमी
 
"माझ्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या मंत्रिमंडळ उपसमितीने दुष्काळ निवारणासाठी आवश्यक सूचना दिल्या आहेत. सर्वच विभागांच्या निधीतील थोडे थोडे पैसे कमी करून दुष्काळी उपाययोजनांवर खर्च करावे. तसेच दुष्काळी उपाययोजनांवर अधिक प्रभावीपणे खर्च करण्यासाठी काटकसर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. मुख्यमंत्र्यांनीही काल सर्वच विभागांचा २० टक्के विकास निधी कमी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. विकासासाठी एखाद्या रस्त्याचे काम काही काळ पुढे ढकलावे लागले, तरी चालेल. मात्र शेतकऱ्यांच्या आत्महत्या परवडणार नाहीत. शेतकऱ्यांना मदत करणे ही आमची प्राथमिकता आहे. चारा आणि पाणीटंचाईवर मात करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना कराव्या लागतील. डीपीडीसीमधून सर्व सिमेंट रस्त्यांचे काम बंद केले असून जलसंधारण, पाणीसाठा वाढविणे आणि जुन्या विहिरींचे पुनर्विकास यावर सरकार भर देत आहे," असेही त्यांनी सांगितले.(Mahayuti Victory in MLC Election 2026)
 
कोणतीही योजना बंद होणार नाही
 
ते पुढे म्हणाले की, "दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर कोणतीही योजना बंद केली जाणार नाही. मात्र, योजनांच्या अंमलबजावणीत आवश्यक सुधारणा करून अनावश्यक खर्च टाळता येऊ शकतो. त्यातून वाचणारा निधी दुष्काळ निवारणासाठी वापरण्यात येईल."
 
राहुल गांधींना जनता उत्तर देईल
 
"राहुल गांधी यांनी केलेल्या मतचोरीच्या आरोपावर प्रतिक्रिया देताना बावनकुळे म्हणाले, राहुल गांधी यांच्या विधानाला काहीही अर्थ नाही. जनता त्यांना मतांमधून उत्तर देते. २०२९ ला पुन्हा एकदा जनता त्यांना धडा शिकवणार आहे. जनता विकासावर मत देते," असेही मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.(Mahayuti Victory in MLC Election 2026)
 
 




अवंती भोयर

विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....
संबंधित मजकूर