मुंबई,: (Kirit Somaiya Slams Sanjay Raut)अल्बानियातील हिंसक आंदोलनादरम्यान सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीला आग लागल्याच्या घटनेचा संदर्भ देत संजय राऊत यांनी भारतानेही या घटनांमधून धडा घ्यावा, असे म्हटले. त्यांच्या या भूमिकेवर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी जोरदार टीका केली आहे.
अल्बानियातील आंदोलनाचा व्हिडीओ शेअर करत राऊत यांनी, सर्वोच्च न्यायालय भ्रष्ट पंतप्रधानांना मदत करत असल्याने नागरिक संतप्त झाले आणि त्यातून सर्वोच्च न्यायालयासह संसद, सरकारी कार्यालये व मंत्र्यांच्या घरांवर हल्ले झाल्याचे म्हटले होते. तसेच, सर्व देशांनी या घटनांपासून धडा घेतला पाहिजे, विशेषतः भारताने, असे त्यांनी नमूद केले(Kirit Somaiya Slams Sanjay Raut)
राऊत यांच्या या वक्तव्यावर किरीट सोमय्या टीका केली. ते म्हणाले की, "अल्बानियात सर्वोच्च न्यायालय जाळले, त्याचे संजय राऊत स्वागत आणि समर्थन करतात. त्यांना अराजकता हवी आहे. याआधी त्यांनी राष्ट्रपती, निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांचा अपमान केला आणि आता त्यांना सर्वोच्च न्यायालय जाळून टाकायचे आहे का? भारतातील जनता अराजकता सहन करणार नाही," असा इशाराही सोमय्या यांनी दिला. तसेच संजय राऊत यांच्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात अवमान याचिका प्रलंबित असून, तिथे त्यांना उत्तर मिळेल, असेही ते म्हणाले.
ते हताश झाले असून त्यांना भारतात सत्तापालट घडवून आणण्यासाठी अराजकता हवी आहे. भारतातील जनता अशा अराजकतावाद्यांचे कधीही समर्थन करणार नाही, असेही किरीट सोमय्या म्हणाले.(Kirit Somaiya Slams Sanjay Raut)
विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....