मुंबई, : (Keshav Upadhye on UBT Dussehra Rally)उबाठा गटाची शिवगर्जना म्हणजे शिवगर्जना नव्हे टोमणेबाजीचा नवा अध्याय आहे. शिवाजी पार्कात म्हणे आज उबाठा गटाचा ‘शिवगर्जना’ मेळावा होणार आहे. पण कसली शिवगर्जना? आजही तेच आरोप, तीच टोमणेबाजी आणि तेच शाब्दिक कोट्या पाहायला मिळतील, अशा शब्दात केशव उपाध्ये यांनी उबाठा गटाच्या दसरा मेळाव्यावर केली.
आपल्या 'एक्स' अकाऊंटवरील पोस्टमध्ये केशव उपाध्ये म्हणाले की, "याकूब मेमनच्या कबरीचे सुशोभीकरण करणारे शिवगर्जना कसली करणार? छत्रपती संभाजीनगरच्या नामकरणाला विरोध करणाऱ्यांसोबत सत्तेची ऊब अनुभवणारे शिवगर्जना कसली करणार? हनुमान चालिसा म्हटली म्हणून अटक करणारे शिवगर्जनेचा जयघोष तरी कसा करणार?," असा सवाल त्यांनी केला.(Keshav Upadhye on UBT Dussehra Rally)
शिवरायांचा वारसा टोमण्यांनी सिद्ध होत नाही
"शिवगर्जना म्हणजे केवळ आवाज नव्हे, ती विचारांची ताकद आणि निष्ठेची ओळख असते. व्यासपीठावर भगवे झेंडे, तोंडात शिवरायांचे नाव आणि राजकारणात मात्र सोयीचे हिंदुत्व हा दुटप्पीपणा महाराष्ट्र ओळखतो. शिवरायांचा वारसा हा टोमण्यांनी सिद्ध होत नाही. तो विचारांशी निष्ठा ठेवून सिद्ध करावा लागतो. म्हणूनच आज शिवाजी पार्कात घुमेल ती शिवगर्जना नव्हे, तर टोमणेबाजीचा गजर आहे. कारण शिवगर्जनेसाठी विचारांचे बळ लागते. शाब्दिक कोट्यांनी केवळ मनोरंजन होते," अशी टीका केशव उपाध्ये यांनी केली.(Keshav Upadhye on UBT Dussehra Rally)
विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....