_202610201231125460_H@@IGHT_350_W@@IDTH_696.jpg)
मुंबई, : (Gokul Milk Union Election Result)कोल्हापूर जिल्ह्यातील राजकारणाच्या दृष्टीने महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडीने १३ जागांवर विजय मिळविला, तर महायुतीच्या छत्रपती शाहू शेतकरी विकास आघाडीला १२ जागांवर समाधान मानावे लागले. गेल्या सहा महिन्यांपासून सुरू असलेल्या राजकीय घडामोडींनंतर या निकालाकडे संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्याचे लक्ष लागले होते.
गोकुळ दूध संघाची निवडणूक केवळ सहकारी संस्थेपुरती मर्यादित न राहता जिल्ह्यातील राजकीय वर्चस्वाची लढाई बनली होती. आमदार सतेज पाटील यांनी माजी खासदार राजू शेट्टी आणि गणपतराव पाटील यांच्यासह समविचारी नेत्यांना एकत्र आणत महायुतीसमोर आव्हान उभे केले. दुसरीकडे, महायुतीच्या छत्रपती शाहू शेतकरी विकास आघाडीनेही मोठी ताकद पणाला लावली होती. त्यामुळे या निवडणुकीतील प्रत्येक जागेच्या निकालाकडे लक्ष लागले होते. या निवडणुकीत काही प्रमुख नेत्यांना पराभवाला सामोरे जावे लागल्याने निकालाची चर्चा रंगली.(Gokul Milk Union Election Result)
मतमोजणीच्या सुरुवातीच्या टप्प्यात सतेज पाटील यांच्या समविचारी आघाडीचे उमेदवार आघाडीवर होते. काही काळ या आघाडीचे सुमारे १५ उमेदवार आघाडीवर असल्याचे चित्र होते. मात्र, पुढील मतमोजणीत आणि एका जागेसाठी झालेल्या फेरमतमोजणीनंतर निकालाचे चित्र बदलले. अखेरीस समविचारी आघाडीला १३, तर महायुतीला १२ जागा मिळाल्या. दरम्यान, मतमोजणीच्या प्रक्रियेवर सतेज पाटील यांनी आक्षेप घेतला. मतमोजणीला जाणीवपूर्वक उशीर केला जात असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. एका जागेच्या फेरमतमोजणीनंतर आपल्या आघाडीची एक जागा कमी झाल्याचेही त्यांनी निदर्शनास आणून दिले.(Gokul Milk Union Election Result)
विजयी उमेदवारांची यादी
राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडी (सतेज पाटील) - १३ जागा
सर्वसाधारण गट
१. अभिजित प्रभाकर तायशेटे
२. शशिकांत आनंदराव पाटील चुयेकर
३. किसन बापूसो चौगुले
४. बाबासाहेब श्रीपती चौगुले
५. राहुल बजरंग देसाई
६. विद्याधर बाबुराव गुरबे
७. बाबासाहेब विष्णू देवकर
८. विश्वजीत दिनकरराव जाधव
महिला राखीव गट
९. अंजना केदारी रेडेकर
१०. भाग्यश्री धीरज डोंगळे
इतर मागासवर्गीय गट
११. शशिकांत शामराव खोत
अनुसूचित जाती गट
१२. राजू बाबा आवळे
भटक्या-विमुक्त जमाती गट
१३. बयाजी शेळके
छत्रपती शाहू शेतकरी विकास आघाडी (महायुती) - १२ जागा
सर्वसाधारण गट
१. राहुल पांडुरंग पाटील
२. चेतन अरुण नरके
३. अजित शशिकांत नरके
४. अंबरीषसिंह संजय घाटगे
५. विरेंद्र संजय मंडलिक
६. मदन बाबुराव देसाई
७. राजेश नरसिंगराव पाटील
८. रणजितसिंह दिलीपराव पाटील
९. रणजितसिंह कृष्णराव पाटील
१०. अजित पांडुरंग पाटील
११. कर्णसिंह गायकवाड
१२. अमर पाटील, कोडोली
(Gokul Milk Union Election Result)