मुंबई, : (Amarsons Store Fire)दक्षिण मुंबईतील भुलाभाई देसाई मार्गावरील अमरसन्स कलेक्शन या स्टोअरला मंगळवारी सकाळी आग लागली. दरम्यान, कॅबिनेट मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी घटनास्थळी जात पाहणी केली.
सकाळी सुमारे ८ वाजता आगीची माहिती मुंबई अग्निशमन दलाला मिळाली. त्यानंतर त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत आग नियंत्रणात आणण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न केले. या दुर्घटनेत दुकानाचे मोठे आर्थिक नुकसान झाल्याची माहिती आहे. मात्र, सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी किंवा दुखापत झाली नाही. अग्निशमन दलासह पोलीस, सार्वजनिक बांधकाम विभाग, बेस्ट, महापालिका विभागीय कर्मचारी आणि १०८ रुग्णवाहिका सेवा घटनास्थळी दाखल झाली होती.
घटनेची माहिती मिळताच मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी घटनास्थळी भेट देऊन आगीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली. संबंधित अधिकाऱ्यांकडून त्यांनी घटनेची माहिती घेतली. आगीचे नेमके कारण आणि नुकसानीचा अंतिम अंदाज याबाबतची माहिती अद्याप स्पष्ट झालेली नाही.(Amarsons Store Fire)