उमर खालिद, शरजील इमामचा जामीन पुन्हा फेटाळला!

    02-Oct-2026
Umar Khalid Sharjeel Imam Bail
 
 
मुंबई (Umar Khalid Sharjeel Imam Bail) : दिल्ली उच्च न्यायालयाने दिल्ली दंगलीच्या कटकारस्थानाच्या प्रकरणात उमर खालिद आणि शरजील इमाम यांच्या जामीन याचिका फेटाळून लावल्या आहेत. न्यायमूर्ती प्रतिभा एम. सिंह आणि न्यायमूर्ती दिनेश भट्ट यांच्या खंडपीठाने हा आदेश दिला. न्यायालयाने नमूद केले की, सर्वोच्च न्यायालयाने जानेवारी २०२६ मध्ये खालिद आणि इमाम यांच्या जामीन याचिका फेटाळल्या होत्या. तसेच, एक वर्षानंतर किंवा संरक्षित साक्षीदारांचे जबाब नोंदवल्यानंतर त्यांना पुन्हा जामिनासाठी अर्ज करता येईल, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले होते. (Umar Khalid Sharjeel Imam Bail)
 
उच्च न्यायालयाने म्हटले की, या दोन्हीपैकी कोणतीही अट अद्याप पूर्ण झालेली नाही. त्यामुळे खालिद आणि इमाम यांना जामीन देणे म्हणजे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशात बदल करण्यासारखे ठरेल. असा बदल करण्याचा अधिकार उच्च न्यायालयाला नाही. न्यायालयाने आपल्या आदेशात म्हटले, “वरील चर्चेचा आणि या प्रकरणातील सर्व तथ्यांचा, विशेषतः गुलफिशा फातिमा प्रकरणातील सर्वोच्च न्यायालयाने घातलेल्या अटींचा विचार करता, या न्यायालयाला कनिष्ठ न्यायालयाच्या आदेशात कोणतीही त्रुटी आढळत नाही. त्यामुळे या अपील याचिका फेटाळण्यात येत आहेत.” (Umar Khalid Sharjeel Imam Bail)
 
खालिदचा जामीन अर्ज उच्च न्यायालयाने फेटाळण्याची ही तिसरी वेळ आहे. तर इमामचा जामीन अर्ज दुसऱ्यांदा फेटाळण्यात आला आहे. सर्वोच्च न्यायालयाने जानेवारी २०२६ मध्ये पाच जणांना जामीन मंजूर केला होता. मात्र, खालिद आणि इमाम यांना त्यावेळी दिलासा मिळाला नव्हता. यानंतर दोघांनी जामिनासाठी नव्याने याचिका दाखल केल्या. सर्वप्रथम त्यांनी कनिष्ठ न्यायालयात धाव घेतली. मात्र, न्यायालयाने ४ जुलै रोजी त्यांच्या याचिका फेटाळून लावल्या. त्यानंतर त्यांनी दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली. (Umar Khalid Sharjeel Imam Bail)
 
 




संबंधित मजकूर