मुंबई: "छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याखाली मावळ्यांच्या जागी ‘कॉकरोच’ दाखविणे, हा शिवरायांचा आणि महाराष्ट्राचा अपमान आहे. असा प्रकार महाराष्ट्रात, मुंबईत कोणताही शिवप्रेमी, महाराष्ट्रप्रेमी आणि देशभक्त सहन करणार नाही,” असा इशारा मत्स्यव्यवसाय व बंदरे विकासमंत्री नितेश राणे यांनी गुरुवारी दिला. "कॉकरोच जनता पार्टी’चे अभिजीत दीपके आणि त्यांच्या सहकार्यांनी या प्रकाराबद्दल माफी मागावी,” अशी मागणीही त्यांनी केली. (Nitesh Rane CJP Shivaji Maharaj)
भाजप प्रदेश कार्यालयात माध्यमांशी संवाद साधताना राणे यांनी ‘सीजेपी’वर हल्ला चढवला. दि. २ ऑक्टोबर रोजी मुंबईतील शिवाजी पार्कवर होणार्या ‘सीजेपी’च्या प्रस्तावित आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर अभिजीत दीपके आणि सौरभ दास यांच्या भूमिकेवर त्यांनी परखड टीका केली. तसेच या आंदोलनांना पाठिंबा देणार्या ठाकरे बंधूंचाही समाचार घेतला. (Nitesh Rane CJP Shivaji Maharaj)
"महाराष्ट्रासाठी छत्रपती शिवाजी महाराज ही ओळख आणि अस्मिता आहे. शिवरायांनी मावळ्यांच्या साथीने हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. त्यामुळे शिवरायांच्या प्रतिमेमध्ये मावळ्यांच्या जागी ‘कॉकरोच’ दाखविणे, हा शिवाजी महाराजांचा अपमान आहे,” असे नितेश राणे म्हणाले. "अभिजीत दीपके यांनी स्वतःच्या सोशल मीडिया अकाऊंटवर प्रसिद्ध केलेला फोटो दाखवत, याबद्दल दीपके आणि त्यांच्या सहकार्यांनी माफी मागावी,” अशी मागणी राणे यांनी केली. (Nitesh Rane CJP Shivaji Maharaj)
"लोकशाहीच्या नावाने आंदोलन करणार्यांनी आधी देशातील लोकशाही व्यवस्था लक्षात घ्यावी. लोकशाही नसती, तर ‘जंतरमंतर’वर आंदोलन करता आले नसते. भारताला लोकशाहीप्रधान देश म्हणून आंतरराष्ट्रीय मान्यता आहे. पाकिस्तान किंवा चीनमध्ये अशा प्रकारचे आंदोलन करता आले असते का,” असा सवालही त्यांनी उपस्थित केला. (Nitesh Rane CJP Shivaji Maharaj)
"उमर खालिदला सरकारने तुरुंगात का ठेवले? तर, तो देशविरोधी आणि संविधानविरोधी असून ‘शरिया’चे समर्थन करणारा आहे. अशा शक्तींना समर्थन देणारे लोक मुखवटे घालून भारताच्या विरोधात भूमिका घेत असतील, संविधान आणि लोकशाहीवर प्रश्न उपस्थित करत असतील, तर ते नेमका कोणाचा अजेंडा चालवत आहेत,” असा सवालही राणेंनी उपस्थित केला. (Nitesh Rane CJP Shivaji Maharaj)
"आंदोलन करण्यापासून कोणालाही रोखता येणार नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. मात्र, आंदोलनाच्या नावाखाली देवी-देवतांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्ये करणे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणे, हा वेगळा मुद्दा आहे. ‘सर तन से जुदा’च्या घोषणा, देवी-देवतांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्ये आणि आता शिवरायांच्या प्रतिमेचा वापर करून मावळ्यांच्या जागी ‘कॉकरोच’ दाखविणे, यामागचा अजेंडा काय आहे,” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. (Nitesh Rane CJP Shivaji Maharaj)
औरंगजेब, टिपू सुलतान समर्थकांसोबत ठाकरे बंधू
"छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान झाल्यानंतरही उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे आंदोलनाला समर्थन देत असतील, तर ते बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे वारसदार कसे,” असा सवाल राणे यांनी केला. यापूर्वी शिवाजी पार्क येथे झालेल्या आंदोलनात कुणाल कामरा सहभागी झाल्याचा उल्लेख करून, "त्याने सीतामातेबद्दल केलेल्या वक्तव्यावर ठाकरे बंधूंनी आक्षेप का घेतला नाही,” असा प्रश्न त्यांनी केला. "हिंदू देवी-देवतांबद्दल बोलण्याची आणि आता शिवरायांबद्दल बोलण्याचीही त्यांची हिंमत उरलेली नाही. देशविरोधी शक्तींशी त्यांची भाषा जुळत आहे,” असेही राणे म्हणाले. (Nitesh Rane CJP Shivaji Maharaj)