मुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज मुंबईतील ‘सह्याद्री’ अतिथीगृहात ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६’अंतर्गत पात्र शेतकर्यांना कर्जमुक्तीच्या तिसर्या टप्प्यातील लाभाचे वितरण करण्यात आले.
या टप्प्यात राज्यातील ३ लाख २७ हजार २५० पात्र शेतकर्यांना एकूण ३ हजार १६० कोटी ४३ लाख रुपयांचा लाभ देण्यात आला.
या योजनेअंतर्गत आतापर्यंत राज्यातील १५ लाख ८५ हजार ४९३ पात्र शेतकर्यांना एकूण १३ हजार २७५ कोटी रुपयांचे वितरण करण्यात आले आहे. त्यामुळे कर्जबाजारी शेतकर्यांना आर्थिक दिलासा मिळणार आहे. (Maharashtra Farmer Loan Waiver 2026)