धारावीच्या पुनर्विकासाची ‘रिअल टाइम’ झलक;मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते धारावी एक्सपिरियन्स सेंटरचे उद्घाटन

Dharavi redevelopment
 
 
मुंबई,(Dharavi redevelopment): धारावी पुनर्विकास प्रकल्पाचा संपूर्ण आराखडा, धारावीचा इतिहास, सध्याचे जीवनमान आणि भविष्यातील धारावीचे स्वरूप नागरिकांना प्रत्यक्ष अनुभवता यावे, यासाठी उभारण्यात आलेल्या ‘धारावी एक्सपिरियन्स सेंटर’चे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शुक्रवार, दि. 2 ऑक्टोबर रोजी करण्यात आले. पीएमजीपी कॉलनी, एच ब्लॉक, बीकेसी, धारावी येथे हे केंद्र उभारण्यात आले आहे. यावेळी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.(Dharavi redevelopment)
 
धारावी पुनर्विकास प्रकल्पाबाबत नागरिकांच्या मनात असलेले प्रश्न, संभ्रम आणि भविष्यातील बदलांची माहिती एकाच ठिकाणी मिळावी, हा या केंद्रामागील प्रमुख उद्देश आहे. धारावी आज कशी आहे, येथील नागरिकांचे जीवनमान कसे आहे, तसेच पुनर्विकासानंतर धारावीचे रूप कसे बदलणार आहे, याचे इमर्सिव्ह आणि दृश्यात्मक सादरीकरण या केंद्रात करण्यात आले आहे.(Dharavi redevelopment)
 
धारावीला केवळ झोपडपट्टी म्हणून न पाहता, मुंबईच्या अर्थव्यवस्थेत महत्त्वाची भूमिका बजावणारे आर्थिक इंजिन म्हणूनही या केंद्रात अधोरेखित करण्यात आले आहे. कुंभारवाड्यातील मातीची भांडी आणि पॉटरी उद्योग, प्लास्टिक रिसायकलिंग, खाद्य उद्योग, चामडे प्रक्रिया तसेच विविध लघुउद्योगांच्या माध्यमातून धारावीत मोठी अर्थव्यवस्था उभी राहिली आहे. या उद्योगांचे स्वरूप, त्यांचे आर्थिक महत्त्व आणि पुनर्विकासानंतर उद्योगांना अधिक चांगल्या सुविधा कशा उपलब्ध होऊ शकतात, याची माहितीही केंद्रात देण्यात आली आहे.(Dharavi redevelopment)
 
उद्याची धारावी कशी असेल?
 
पुनर्विकासानंतर धारावीत प्रस्तावित करण्यात आलेली पुनर्वसन घरे, खुल्या जागा, शाळा, रुग्णालये, धार्मिक स्थळे आणि इतर नागरी सुविधांची माहिती या केंद्रात पाहता येणार आहे. भविष्यातील धारावीचा लेआऊट आणि विविध सुविधांचे नियोजन दृश्य माध्यमातून नागरिकांसमोर मांडण्यात आले आहे. विशेष म्हणजे, पुनर्विकास प्रकल्पांतर्गत रहिवाशांना देण्यात येणाऱ्या घरांचे सॅम्पल फ्लॅटदेखील केंद्रात तयार करण्यात आले आहेत. मुख्यमंत्री फडणवीस यांनी या नमुना सदनिकांची पाहणी केली. त्यामुळे रहिवाशांना भविष्यात मिळणाऱ्या घरांची रचना, जागा आणि सुविधांचा प्रत्यक्ष अनुभव घेता येणार आहे.(Dharavi redevelopment)

‘मेरे सपनों की धारावी 2.0’ पुस्तकाचे प्रकाशन
 
यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘मेरे सपनों की धारावी 2.0 आर्ट कॉन्टेस्ट’ या पुस्तकाचेही प्रकाशन करण्यात आले. भारतीय स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजित ‘मेरे सपनों की धारावी 2.0’ उपक्रमांतर्गत धारावीतील विविध शाळांमध्ये आंतरशालेय चित्रकला स्पर्धा आणि विज्ञान प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी साकारलेल्या कलाकृतींचे संकलन या पुस्तकात करण्यात आले आहे.(Dharavi redevelopment)
 
विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीतून स्वच्छ, सुरक्षित, हरित आणि समृद्ध धारावीचे स्वप्न या कलाकृतींच्या माध्यमातून समोर आले आहे. धारावी पुनर्विकासाशी संबंधित माहिती केवळ आराखड्यापुरती मर्यादित न ठेवता ती नागरिकांना प्रत्यक्ष अनुभवता यावी, यासाठी ‘धारावी एक्सपिरियन्स सेंटर’ महत्त्वाचे माध्यम ठरणार आहे. आजची धारावी, तिची अर्थव्यवस्था आणि संस्कृती जपत उद्याची आधुनिक धारावी कशी उभी राहणार आहे, याची संपूर्ण झलक या केंद्रातून पाहायला मिळणार आहे.(Dharavi redevelopment)
 
आज धारावीमध्ये धारावी एक्सपिरियन्स सेंटरच उद्घाटन करण्यात आले आहे. धारावी पुनर्निर्माणाचा प्रकल्प आहे. हा नेमका कसा असणार आहे? याची रियल टाईम माहिती या ठिकाणी आहे. उद्याच्या धारावीत हे सगळे कसे असणार आहे. हे देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. रिहॅब कसे होणार, लोकांना ओपन स्पेसेस कशा मिळणार, जीवन कसे बदलणार याचा लेआऊट इथे असेल. आज हे उद्योग चांगल्या जागेत जातील. चांगल्या शाळा, चांगले हॉस्पिटल्स, धार्मिक स्थळं अशा सगळ्या गोष्टी इथे संकल्पित करण्यात आल्या आहेत. एक इमर्सिव एक्सपिरियन्सच्या माध्यमातून लोकांना पाहायला मिळतील. त्याचसोबत जे काही त्यांना रिहॅब मध्ये घरे मिळणार आहेत. त्याचे सॅम्पल फ्लॅट देखील या ठिकाणी तयार करण्यात आलेले आहेत. त्यामुळे तेही याठिकाणी पाहायला मिळतील. अनेक लोकांच्या मनामध्ये हा संभ्रम असतो की, नेमकं काय होणार आहे. त्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर या धारावी एक्सपिरियन्स सेंटरमध्ये मिळेल.(Dharavi redevelopment)
 
- देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री
 
 
 
 




गायत्री श्रीगोंदेकर

मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.
संबंधित मजकूर