वराह पूजन केले म्हणून हिंदू किन्नरवर प्राणघातक हल्ला!

जबरदस्तीने धर्मांतराचा प्रयत्न केल्याचाही आरोप

    02-Oct-2026   
       

Sambhajinagar Kinnar Attack

मुंबई (Sambhajinagar Kinnar Attack) : वराह पूजन का करतोस आणि नमाज का पढत नाहीस, असा जाब विचारत एका हिंदू किन्नरवर धर्मांध मुस्लिम किन्नरांनी चाकूने प्राणघातक हल्ला केल्याची घटना छत्रपती संभाजीनगर येथे घडली आहे. हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या किन्नरवर सध्या छत्रपती संभाजीनगरातील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. संबंधित प्रकरणी छत्रपती संभाजीनगरच्या सीटी चौक पोलीस स्थानकात तक्रार दाखल झाली असून एकूण सात आरोपींविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. (Sambhajinagar Kinnar Attack)
 
मिळालेल्या एफआयआर कॉपीनुसार, अमानुष मारहाण सुरू असताना आरोपींनी थेट मुख्य सूत्र म्हणून आरोप असलेल्या रंजिता नायक तथा सलीम शेख याच्या मोबाईलवर व्हिडिओ कॉल लावून या कृत्याचे लाईव्ह फूटेज दाखवले. तसेच "आमचे ऐकले नाहीस तर तुकडे तुकडे करू," अशी उघड धमकी देत गळ्यातील सोन्याची चेन लुटल्याचा प्रकार समोर आला आहे. (Sambhajinagar Kinnar Attack)
 
अशी माहिती आहे की, संबंधित पीडित हिंदू किन्नर नाशिकवरून नारळीबाग येथील घरी परतत असताना भूक लागल्याने जेवणाचे पार्सल घेऊन त्या पहाटे ३ वाजायच्या सुमारास आपल्या गाडीने घरी परत येत होत्या. शेतकरी भवनजवळ पाच अज्ञात इसमांनी त्यांची कार अडवली. त्या गाडीतून खाली उतरताच धर्मांधांनी गाडीवर दगड मारला आणि "रंजिता नायक उर्फ सलीम शेख व कोमल यांच्या सांगण्यावरून का चालत नाहीस? तुला नमाज पढण्यास सांगितले असताना तू वराह पूजन का करतोस?" असा जाब विचारत त्यांच्यावर हल्ला केला. त्यांच्या डोक्याला, तोंडाला गंभीर मारहाण झाली. त्यानंतर पाठीवर, खांद्यावर, पोटावर आणि हातावर चाकूने वार केले. ही अमानुष मारहाण सुरू असतानाच एका आरोपीने रंजिता नायक उर्फ सलीम शेख आणि कोमल शेख यांना व्हिडिओ कॉल लावून हा संपूर्ण प्रकार थेट दाखवला. (Sambhajinagar Kinnar Attack)
 
या घटनेमुळे संपूर्ण हिंदू किन्नर समाजात तीव्र संतापाची लाट पसरली आहे. जबरदस्तीने धर्मांतर घडवून आणण्यासाठीच हा प्राणघातक हल्ला करण्यात आल्याचा दावा करत, "आम्ही प्राण गमावू, परंतु आमचा हिंदू धर्म कधीही सोडणार नाही," असा आक्रमक आणि खंबीर इशारा हिंदू किन्नर समाजाने दिला आहे. या प्रकरणी सीटी चौक पोसील स्थानकात रंजिता नायक उर्फ सलीम शेख, कोमल आणि अन्य पाच जणांविरोधात भारतीय न्याय संहिता,२०२३ अंतर्गत कलम १०९(१), १२६(२), १८९(२), १९०, १९१(२), ३२४(२), ३५२(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Sambhajinagar Kinnar Attack)
 
या संपूर्ण प्रकारानंतर हिंदू किन्नर समाजातील प्रतिनिधींनी ‘किन्नर जिहाद’चा थेट आरोप केला आहे. हिंदू किन्नरांवर सतत दबाव आणून त्यांचे 'ब्रेनवॉश' करण्याचे जाणीवपूर्वक प्रयत्न सुरू असल्याचा दावा त्यांनी केला. या दबावाला किंवा धर्मांतराला नकार दिल्यास हिंदू किन्नरांच्या रोजगारात अडथळे निर्माण केले जात आहेत, तसेच आवाज उठवणाऱ्यांवर हिंसक हल्ले केले जात आहेत. यामुळे सध्या अनेक हिंदू किन्नर भयाखाली वावरत असल्याचे समाजाने सांगितले. दरम्यान, या घटनेतील सर्व मुख्य आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात असून पोलीस या प्रकरणाचा सर्व बाजूंनी सखोल तपास करत आहेत. (Sambhajinagar Kinnar Attack)
 
 




ओंकार मुळ्ये

'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक
संबंधित मजकूर