“त्यावेळीही मी हनुमान चालीसा म्हणत होतो!” कॅप्टन स्मित मच्छार यांनी पंतप्रधान मोदींना सांगितला कॉकपिटमधील थरारक प्रसंग

 
Captain Smit Machar Hanuman Chalisa
 
नवी दिल्ली (Captain Smit Machar Hanuman Chalisa) : दुबईहून इस्रायलला जाणाऱ्या फ्लायदुबई विमानातील आपल्या सहवैमानिकाशी झुंज देत शेकडो प्रवाशांचे प्राण वाचवणाऱ्या भारतीय वैमानिक स्मित मच्छार यांचे जगभरात कौतुक होत आहे. जखमी स्मित मच्छार यांच्यावर अबू धाबीतील रुग्णालयात उपचार सुरू असून, त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचे सांगण्यात येते.
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही स्मित मच्छार यांच्या धाडसाचे कौतुक करत व्हिडिओ कॉलद्वारे त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. स्मित मच्छार यांनी कॉकपिटमधील घडलेली घटना सांगताना ते म्हणाले, “मला जेव्हा-जेव्हा वेदना होतात, तेव्हा मी हनुमान चालीसा म्हणतो. त्यावेळीही मी हनुमान चालीसा म्हणत होतो.” (Captain Smit Machar Hanuman Chalisa)
 
 
 
पंतप्रधान मोदी यांनी, “कॉकपिटमध्ये नेमके काय घडले होते?” असा प्रश्न विचारला. स्मित मच्छार यांनी कॉकपिटमधील थरारक घटना सांगताना म्हणाले, “माझ्या शरीरावर अनेक जखमा होत्या. मी खाली पडलो होतो. विमान वेगाने खाली जात होते. मी जर योग्य वेळी कॉकपिटचे दार उघडले नसते, तर अनर्थ घडला असता. मला माझ्या जीवापेक्षा विमानातील प्रवाशांची काळजी वाटत होती,” असे कॅप्टन स्मित मच्छार म्हणाले. (Captain Smit Machar Hanuman Chalisa)
 
वेदना होत असताना हनुमान चालीसा म्हणत होतो’
 
या संपूर्ण प्रसंगात मानसिक धैर्य कसे टिकवले, याबाबत बोलताना कॅप्टन मच्छार म्हणाले की, “मला जेव्हा वेदना होतात, तेव्हा मी हनुमान चालीसा म्हणतो. त्यावेळीही मी हनुमान चालीसा म्हणत होतो.” संकटाच्या क्षणीही आपण ती म्हणत असल्याचे त्यांनी सांगितले. (Captain Smit Machar Hanuman Chalisa)
 
आपल्याला योग्य उपचार मिळत असल्याचे सांगताना मच्छार यांनी सकारात्मक राहण्यावर विश्वास असल्याचेही सांगितले. पंतप्रधानांशी संवाद साधताना ते भावुक झाले. त्यांनी हा संवाद आपल्यासाठी विशेष असल्याचे सांगितले.
 
कॅप्टन मच्छार यांनी आपल्या कुटुंबाचाही यावेळी उल्लेख केला. आपण सकाळी देवपूजा करताना आपला दोन वर्षांचा मुलगाही आपल्यासोबत बसतो आणि त्याला हनुमान चालीसा ऐकवतो, असे त्यांनी सांगितले. परदेशात असलो तरी आपल्या संस्कृतीपासून दूर गेलेलो नसल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. (Captain Smit Machar Hanuman Chalisa)
 
मोदींकडून कॅप्टन मच्छार यांच्या धैर्याचे कौतुक
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कॅप्टन मच्छार यांच्या धैर्याचे कौतुक करत त्यांच्या प्रसंगावधानामुळे मोठी दुर्घटना टळण्यास मदत झाल्याचे म्हटले. मच्छार यांनी जखमी अवस्थेतही कॉकपिटचे दार उघडून परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावल्याचे वृत्त आहे. (Captain Smit Machar Hanuman Chalisa)
 
 




मुंबई तरुण भारत वेब टीम

Hello, You must be familiar with the Nation First approach daily 'Mumbai Tarun Bharat' as a newspaper committed to fearless and nationalist ideals and constantly doing conscious journalism for it. The journey of four decades has been successful only because of your trust and cooperation. Dear readers, we have been making a successful effort to always be perfect in our commitment to the thoughts of the nation and the national interest...
 
Changing with time is essential for any organization. Daily 'Mumbai Tarun Bharat' has decided to take this role here too and make 'MahaMTB' available in the media for the new 'smart' generation. Today's youth, readers, and citizens are becoming more and more 'smart' day by day. And in today's 'smart' era, information is available in abundance in the Internet-enabled information explosion. However, there is a need for complementary knowledge to determine a modern role and approach that is compatible with culture, motionlessness and tradition.
 
That is why mahamtb.com, MahaMTB Mobile App', MahaMTB Youtube Channel, MahaMTB Facebook Page, MahaMTB Twitter, MahaMTB Instagram, MahaMTB Telegram, MahaMTB WhatsApp Group etc. through social media and advanced avatar content. We are coming before you. Role in the new era, 'smart' journalism with a view, 'smart' multimedia for the new era, and journalism for a 'smart' Maharashtra will be the side of the game.
 
Now get all the updates in one click! mahamtb.com
संबंधित मजकूर