दादासाहेब फाळके चित्रनगरीसाठी मानखुर्दची १४ एकर जमीन

    02-Oct-2026   
Dadasaheb Phalke Chitranagari
 
मुंबई,(Dadasaheb Phalke Chitranagari) : दादासाहेब फाळके चित्रनगरीच्या बाह्य चित्रिकरणासाठी मुंबईतील मानखुर्द येथील सुमारे १४ एकर शासकीय जमीन सांस्कृतिक कार्य विभागाला देण्यास महसूल विभागाने मान्यता दिली आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या पुढाकाराने हा निर्णय घेण्यात आला.(Dadasaheb Phalke Chitranagari)
 
मौजे मानखुर्द, ता. कुर्ला येथील सर्व्हे क्रमांक १३८ पैकी तसेच लगतच्या मिळकतीतील अंदाजे १४ एकर म्हणजेच सुमारे ५६ हजार ६६६ चौ.मी. जमीन सांस्कृतिक कार्य विभागाला बाह्य चित्रिकरणासाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे. जमीन महाराष्ट्र जमीन महसूल जमीन संहिता, १९६६ मधील कलम ४० नुसार प्राप्त अधिकारात महसूलमुक्त व भोगाधिकार मूल्यरहित किमतीने देण्यास शासनाने मान्यता दिली आहे. (Dadasaheb Phalke Chitranagari)
 
याबाबत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, “महाराष्ट्राच्या चित्रपटसृष्टीला आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. दादासाहेब फाळके यांच्या नावाने असलेल्या चित्रनगरीच्या विकासासाठी बाह्य चित्रिकरणासाठी आवश्यक जमीन उपलब्ध करून देताना शासनाने सार्वजनिक हित आणि जमिनीचा नियोजनबद्ध वापर यांचा समतोल साधला आहे.”(Dadasaheb Phalke Chitranagari)
 
 




अवंती भोयर

विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....
संबंधित मजकूर