१० दिवसांपासून टायगर श्रॉफवर पाळत! सोशल मीडिया व्हिडिओ आणि ब्लॉगर्सच्या माध्यमातून माहिती गोळा; हरियाणातील अल्पवयीन मुलासह दोन आरोपी पोलिसांच्या ताब्यात
मुंबई (Tiger Shroff Firing Case) : बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफ यांच्या गाडीवर झालेल्या गोळीबाराच्या घटनेनंतर मुंबई पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. या प्रकरणातील तीन आरोपींना राजस्थान पोलिसांनी आणि अँटी-गँगस्टर टास्क फोर्सने सोमवार, दि. १९ ऑक्टोबर रोजी राजस्थानमधील कोटा रेल्वे स्थानकावरून ताब्यात घेतले. आरोपी मुंबईहून दिल्लीच्या दिशेने जाणाऱ्या रेल्वेगाडीतून प्रवास करत होते. दरम्यान, अनिल पंडित याने या गोळीबाराची जबाबदारी स्वीकारल्याचे सांगितले जात आहे.
कोटा शहर पोलीस अधीक्षक तेजस्विनी गौतम यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई पोलिसांकडून आरोपींबाबत माहिती मिळताच कोटा पोलिसांनी रेल्वेगाडीत शोधमोहीम राबवली. पोलिसांनी अवघ्या १५ मिनिटांत पोलिसांनी तिन्ही संशयितांना शोधून ताब्यात घेतले. या कारवाईत राजस्थान पोलिसांसह संबंधित तपास यंत्रणांनी समन्वय साधला. (Tiger Shroff Firing Case)
मुंबई पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी गेल्या १० दिवसांपासून टायगर श्रॉफ यांच्यावर नजर ठेवून होते. त्यांनी टायगर यांच्या घराची आणि व्यायामशाळेची रेकी केली होती. गोळीबार करण्यापूर्वी आरोपींनी सुमारे ४५ मिनिटे परिसराची पाहणी केली होती. तसेच, सोशल मीडियावरील पापाराझींचे व्हिडिओ आणि ब्लॉगर्सच्या कंटेंटच्या माध्यमातून टायगर यांचे लोकेशन आणि दैनंदिन दिनचर्येची माहिती गोळा केली जात होती. (Tiger Shroff Firing Case)
कोण आहेत ताब्यात घेतलेले आरोपी?
या प्रकरणात पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या संशयितांमध्ये हरियाणातील रेहान आणि अल्पवयीन मुलासह, बिहारमधील ऋतिक कुमार उर्फ रोशन यांचा समावेश असल्याचे वृत्त आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोळीबारानंतर आरोपींनी मुंबई सोडून पळ काढला होता. त्यांना कोटा येथे रेल्वेगाडीतून ताब्यात घेण्यात आले. या प्रकरणाचा पुढील तपास मुंबई पोलिसांकडून सुरू आहे. (Tiger Shroff Firing Case)
नेपाळला पळून जाण्याची योजना होती?
प्राथमिक तपासात मिळालेल्या माहितीनुसार, आरोपींची नेपाळला पळून जाण्याची योजना असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. त्यासाठी जयपूरमार्गे पुढे जाण्याचा विचार असल्याचे वृत्त आहे. पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतले मात्र, आरोपींच्या प्रवासाचा नेमका मार्ग आणि पुढील योजना याबाबत तपास यंत्रणांकडून अधिक माहिती गोळा केली जात आहे. (Tiger Shroff Firing Case)
कोण आहे अनिल पंडित?
या गोळीबार प्रकरणात लॉरेन्स बिश्नोई टोळीशी संबंधित असल्याचा दावा करण्यात येत असलेल्या अनिल पंडितचे नाव चर्चेत आले आहे. वृत्तांनुसार, अनिल पंडितने गोळीबाराची जबाबदारी स्वीकारल्याचा दावा करण्यात आला होता. पोलिसांकडून या दाव्यांची आणि आरोपींच्या कथित संपर्कांची चौकशी सुरू आहे. (Tiger Shroff Firing Case)
अनिल पंडितवर यापूर्वीही अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्यामध्ये जून २०२६ मध्ये दिल्लीतील पश्चिम विहार येथे व्यायामशाळेबाहेर गोळीबार करणे, जुलै २०२६ मध्ये पंजाबी गायक गुरू रंधावा यांच्या व्यायामशाळेबाहेर गोळीबार करणे, तसेच हरियाणा, दिल्ली आणि पुणे येथे गोळीबार व गुंडगिरीच्या विविध प्रकरणांचा समावेश आहे.
दरम्यान, टायगर श्रॉफ यांच्या गाडीवर झालेल्या गोळीबारामागील नेमके कारण, आरोपींची भूमिका आणि कथित टोळीशी असलेले संबंध यांचा तपास सुरू आहे. (Tiger Shroff Firing Case)
Hello, You must be familiar with the Nation First approach daily 'Mumbai Tarun Bharat' as a newspaper committed to fearless and nationalist ideals and constantly doing conscious journalism for it. The journey of four decades has been successful only because of your trust and cooperation. Dear readers, we have been making a successful effort to always be perfect in our commitment to the thoughts of the nation and the national interest...
Changing with time is essential for any organization. Daily 'Mumbai Tarun Bharat' has decided to take this role here too and make 'MahaMTB' available in the media for the new 'smart' generation. Today's youth, readers, and citizens are becoming more and more 'smart' day by day. And in today's 'smart' era, information is available in abundance in the Internet-enabled information explosion. However, there is a need for complementary knowledge to determine a modern role and approach that is compatible with culture, motionlessness and tradition.
That is why mahamtb.com, MahaMTB Mobile App', MahaMTB Youtube Channel, MahaMTB Facebook Page, MahaMTB Twitter, MahaMTB Instagram, MahaMTB Telegram, MahaMTB WhatsApp Group etc. through social media and advanced avatar content. We are coming before you. Role in the new era, 'smart' journalism with a view, 'smart' multimedia for the new era, and journalism for a 'smart' Maharashtra will be the side of the game.