_202610191151117431_H@@IGHT_350_W@@IDTH_696.jpg)
डोंबिवली : (Janardan Mhatre Family Donation)महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी आणि त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्यासाठी राजकीय व सामाजिक स्तरावरून मदतीचा ओघ सुरू झाला आहे. याच सामाजिक बांधिलकीची जपणूक करत कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे माजी सभापती तथा माजी नगरसेवक जनार्दन म्हात्रे, नगरसेविका रेखा जनार्दन म्हात्रे आणि प्रियदर्शनी म्हात्रे यांनी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी एक लाख रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री सहाय्यता निधीला सुपूर्द केला आहे.(Janardan Mhatre Family Donation)
कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्याकडे धनादेश सुपूर्द करण्यात आला आहे.
यावेळी ठाण्याचे खासदार नरेश म्हस्के आणि आमदार राजेश मोरे हे देखील उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी म्हात्रे परिवाराच्या या संवेदनशील पाऊलाचे विशेष कौतुक केले.
सामाजिक बांधिलकीचे दर्शन
राज्यात निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीमुळे बळीराजा संकटात सापडला आहे. अशा कठीण काळात केवळ शासकीय मदतीवर अवलंबून न राहता, समाजातील जबाबदार घटकांनी पुढे येणे गरजेचे आहे, हाच संदेश म्हात्रे कुटुंबियांनी या मदतीद्वारे दिला आहे. जनार्दन म्हात्रे यांनी नेहमीच विविध सामाजिक उपक्रमांतून नागरिकांना मदत केली असून, आता थेट राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी धावून जात त्यांनी आपल्या दातृत्वाचा परिचय दिला आहे.(Janardan Mhatre Family Donation)