कलाकारांना धमकावण्याचे प्रकार खपवून घेणार नाही; गुंडगिरीचा बीमोड करणार – एकनाथ शिंदे

    19-Oct-2026

Eknath Shinde on Artists’ Safety
 
 
मुंबई : (Eknath Shinde on Artists’ Safety)अभिनेत्याच्या घराबाहेर झालेल्या गोळीबाराच्या घटनेचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तीव्र निषेध केला. या घटनेत पाच गोळ्या झाडण्यात आल्या. सुदैवाने अभिनेता सुरक्षित असून, त्याच्या चालकाला दुखापत झाली आहे. अभिनेत्याच्या डाव्या हाताला गनपावडर आणि काचेचे तुकडे लागल्याने जखमा झाल्या आहेत. या घटनेमुळे अभिनेता आणि त्याची आई हादरले असल्याचे शिंदे यांनी सांगितले.
 
“सार्वजनिक क्षेत्रातील व्यक्तींना उघडपणे धमक्या दिल्या जात असताना राज्य सरकार त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहे. कोणत्याही प्रकारच्या धमक्या खपवून घेतल्या जाणार नाहीत. १९९० च्या दशकात मुंबईत टोळीयुद्धाच्या घटना सामान्य होत्या; मात्र १९९५ मध्ये मुंबई पोलिसांनी त्याला आळा घातला. लोकांना धमकावण्याचे आणि दहशत निर्माण करण्याचे प्रकार सहन केले जाणार नाहीत. या गुंडगिरीचा बीमोड करू,” असा इशारा एकनाथ शिंदे यांनी दिला.(Eknath Shinde on Artists’ Safety)
 
 




संबंधित मजकूर