दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सरकारी कर्मचारी सरसावले; मुख्यमंत्री सहायत्ता निधीस देणार एका दिवसाचे वेतन

    18-Oct-2026   

Maharashtra Drought Relief 
 
मुंबई, : (Maharashtra Drought Relief)राज्यात यंदा उद्भवलेल्या दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर अडचणीत सापडलेल्या शेतकरी बांधवांना मदतीचा हात देण्यासाठी राज्यभरातील शासकीय अधिकारी आणि कर्मचारी पुढे आले आहेत. राज्यातील सर्व सनदी अधिकाऱ्यांसह (भा.प्र.से., भा.पो.से., भा.व.से.) शासकीय व निमशासकीय कर्मचाऱ्यांच्या ऑक्टोबर महिन्याच्या वेतनातून एका दिवसाचे वेतन ‘मुख्यमंत्री सहायता निधी’त देणगी म्हणून जमा करण्यात येणार आहे. सामान्य प्रशासन विभागाच्या वतीने याबाबतचे परिपत्रक जारी केले.(Maharashtra Drought Relief)
 
राज्यातील शेतकऱ्यांच्या मदतकार्यास हातभार लागावा म्हणून ‘महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघ’ आणि ‘राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना’ यांनी अनुक्रमे पत्राद्वारे शासनास एका दिवसाचे वेतन देण्याची इच्छा कळवली होती. त्यानुसार शासनाने सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना कर्तव्यभावनेने या मदतकार्यात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.(Maharashtra Drought Relief)
 
मंत्रालयीन विभागांसह जिल्हा परिषदा, पंचायत समित्या, महानगरपालिका, नगरपालिका, नगरपरिषदा, शासकीय महामंडळे, मंडळे तसेच सर्व स्वायत्त संस्थेचे विभागप्रमुख यांनी आपल्या विभागातील/कार्यालयातील सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांना याबाबतचे गांभीर्य समजावून सांगून एक दिवसाचे वेतन मुख्यमंत्री सहायता निधीत जमा करण्यास प्रोत्साहित करावे, असे या परिपत्रकात सांगण्यात आले आहे.(Maharashtra Drought Relief)
 
हरकत असल्यास दोन दिवसांत अर्ज करा
 
ज्या अधिकारी अथवा कर्मचाऱ्यांना आपल्या वेतनातून ही रक्कम देण्यास हरकत असेल, त्यांच्यासाठी शासनाने ऐच्छिक पर्याय ठेवला आहे. अशा कर्मचाऱ्यांनी विहित नमुन्यातील हरकतपत्र आपल्या कार्यालय प्रमुख अथवा आहरण व संवितरण अधिकाऱ्यांकडे दोन दिवसांच्या आत सादर करणे आवश्यक आहे.(Maharashtra Drought Relief)
 




अवंती भोयर

विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....
संबंधित मजकूर