डोंबिवलीत आंतरराष्ट्रीय व्हाइट केन डे उत्साहात साजरा

    18-Oct-2026   

International White Cane Day Dombivli 
 
डोंबिवली,:(International White Cane Day Dombivli)रोटरी क्लब ऑफ डोंबिवली सिटी, जीवन आधार सोशल ऑर्गनायझेशन आणि एस. आर. एस. फायनान्स यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार, दिनांक १७ ऑक्टोबर २०२६ रोजी विनायक हॉल, गणेश मंदिर, डोंबिवली येथे आंतरराष्ट्रीय व्हाइट केन डे उत्साहात साजरा करण्यात आला.
 
दृष्टिबाधित व्यक्तींमध्ये आत्मविश्वास निर्माण करणे, त्यांना शिक्षण व आधुनिक तंत्रज्ञानाची ओळख करून देणे आणि स्वावलंबनासाठी प्रोत्साहित करणे या उद्देशाने आंतरराष्ट्रीय व्हाइट केन डे डोंबिवलीत उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी व्हिजन इनसाइट फाउंडेशन आणि स्नेहांकित हेल्पलाइन, मुंबई यांच्याशी संबंधित सुमारे ६० दृष्टिबाधित बांधव व विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.(International White Cane Day Dombivli)
 
कार्यक्रमाची सुरुवात दुपारी १ वाजता जनजागृती रॅलीने झाली. गणेश मंदिर येथून निघालेली ही रॅली फडके रोड, मार्केट आणि नेहरू रोडमार्गे पुन्हा गणेश मंदिर येथे पोहोचली. दृष्टिहीन व्यक्तींचे हक्क, क्षमता आणि स्वावलंबन याबाबत समाजात जनजागृती करण्याचा संदेश या रॅलीतून देण्यात आला.त्यानंतर दुपारी १.३० वाजता गणेश मंदिरातील विनायक हॉलमध्ये मार्गदर्शनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
 
कार्यक्रमातील विशेष आकर्षण म्हणजे तिन्ही मार्गदर्शक महिला स्वतः दृष्टिबाधित असूनही स्वतःच्या अनुभवातून ज्ञानाची देवाणघेवाण करत, उपस्थित दृष्टिबाधित विद्यार्थी व बांधवांसमोर आत्मविश्वास, जिद्द आणि स्वावलंबनाचा प्रेरणादायी आदर्श ठेवला.
सोनल राठोड यांनी शिक्षणातील कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) उपयोग, तसेच संगणक शिक्षण आणि आधुनिक तंत्रज्ञानातील स्वतःच्या अनुभवांबद्दल माहिती दिली.
 नुपूर जोशी यांनी विद्यार्थ्यांचे शारीरिक व मानसिक आरोग्य या विषयावर मार्गदर्शन केले. सीमा भारंबे यांनी शिक्षणामध्ये सॉफ्ट स्किल्स उपयोगाविषयी माहिती दिली.(International White Cane Day Dombivli)
 
या कार्यक्रमाला रोटरी डिस्ट्रिक्ट गव्हर्नर डॉ. निलेश जयवंत प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. यावेळी रोटरी क्लब ऑफ डोंबिवली सिटीचे अध्यक्ष प्रसाद खोत, जीवन आधार सोशल ऑर्गनायझेशनचे अध्यक्ष उमेश चव्हाण, एस. आर. एस. फायनान्सचे संचालक संदीप बारवकर, रोटरी क्लब ऑफ डोंबिवली अध्यक्षा रसिका मोडक, रोटरी क्लब ऑफ डोंबिवली नॉर्थच्या अध्यक्षा माया सामंत, रोटरी क्लब ऑफ डोंबिवली अपटाऊनचे अध्यक्ष डॉ. विजय शेट्टी, रोटरी क्लब ऑफ डोंबिवली विनर्सचे अध्यक्ष सीए . उज्ज्वल ठोंबरे, व्हिजन इनसाइट फाउंडेशनचे हेमंत पाटील, स्नेहांकित हेल्पलाइनच्या संपदा पळणीटकर आणि रोटरी डिस्ट्रिक्ट सेक्रेटरी संजीव जोशी उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दृष्टिबाधित बांधवांना आणि विद्यार्थ्यांना डॉक्युमेंट फोल्डर देण्यात आल्या. शिक्षण, आरोग्य, आधुनिक तंत्रज्ञान आणि सामाजिक सहभागाच्या माध्यमातून दृष्टिबाधित व्यक्तींना सक्षम बनविण्याचा सकारात्मक संदेश या उपक्रमातून देण्यात आला.(International White Cane Day Dombivli)
 
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उमेश चव्हाण यांनी उत्कृष्टपणे केले. “सहानुभूतीपलीकडे जाऊन संधी, कौशल्य आणि स्वावलंबनाची जोड देणे” हा या उपक्रमाचा मुख्य हेतू आहे. दृष्टिबाधित व्यक्तींना समाजाच्या मुख्य प्रवाहात समान संधी मिळाव्यात आणि त्यांचा स्वावलंबनाचा प्रवास अधिक सक्षम व्हावा, या सामाजिक बांधिलकीची जाणीव करून देणारा हा उपक्रम उत्साहात संपन्न झाला.(International White Cane Day Dombivli)
 




संबंधित मजकूर