युरोप अस्थिर करण्याचे षड्यंत्र? फ्रान्ससह चार देशांत आंदोलनांना हिंसक वळण; ट्रम्प यांनी उडवली खिल्ली!

 
Europe Protests 2026
 
मुंबई (Europe Protests 2026) : महागाई, बेरोजगारी, घरांच्या वाढत्या किमती आणि शिक्षणाचा खर्च यांसारख्या मुद्द्यांवरून युरोपातील अनेक देशांमध्ये नागरिकांचा असंतोष उफाळून आला आहे. शनिवार,दि. १७ ऑक्टोबर रोजी फ्रान्स, अल्बानिया, इटली, पोर्तुगाल आणि बेल्जियममध्ये विविध मागण्यांसाठी आंदोलने करण्यात आली. काही ठिकाणी या आंदोलनांना हिंसक वळण लागल्याने आंदोलक आणि पोलिसांमध्ये संघर्ष झाला.
 
आंदोलकांनी सरकारी इमारतींचे नुकसान केले, दुकानांची लूट केली, तसेच फ्रान्समधील १४० वर्षे जुन्या ऐतिहासिक टाऊन हॉलला आग लावण्यात आली. युरोपात सुरू असलेल्या या आंदोलनांमुळे तेथील सरकारांची चिंता आणखी वाढली आहे. Europe Protests 2026
 
ट्रम्प यांनी उडवली खिल्ली!
 
अमेरिकेचे राष्ट्रअध्यक्ष डोनांल्ड ट्रम्प यांनी या आंदोलनाची खिल्ली उडवली. ते म्हणाले, ‘चला, फ्रान्सला जाऊया! हे एक अतिशय सुंदर ठिकाण आहे. तिथे कोणत्याही दंगली होत नाहीत, कोणतीही क्रांती होत नाही. तसे पाहायला गेले, तर क्रांतीसाठी फ्रान्स हे एकदम उत्तम ठिकाण वाटते. विश्वासच बसत नाही! चला, फ्रान्सला जाऊया आणि क्रांतीत सहभागी होऊया.’ Europe Protests 2026
 
फ्रान्समधील अनेक शहरांत जाळपोळ आणि लूटमार
 
फ्रान्समध्ये आंदोलनात सहभागी झालेल्यांच्या संख्येवरून सरकार आणि कामगार संघटनांनी वेगवेगळे आकडे दिले आहेत. फ्रान्सचे गृहमंत्री लॉरां नुनेझ यांच्या माहितीनुसार, सुमारे ५.५ लाख नागरिक आंदोलनात सहभागी झाले होते. तर कामगार संघटना सीजीटीने हा आकडा आठ लाखांपर्यंत असल्याचा दावा केला. Europe Protests 2026
 
बहुतांश आंदोलने शांततेत झाली असली, तरी काही शहरांमध्ये हिंसक घटना घडल्या. लिमोज शहरातील नगरभवनाला आग लावण्यात आली. मार्सिले येथे आंदोलक नगरभवनात घुसले आणि भिंतींवर घोषणाबाजी केली. लियॉनमधील पर्यटन माहिती केंद्रालाही आग लावण्यात आल्याचे वृत्त आहे.
 
पॅरिसमध्ये पोलिसांनी आंदोलकांना पांगवण्यासाठी अश्रुधुराचा वापर केला. काही हिंसक गटांनी दुकाने, बँका आणि कपडे व मोबाइल फोनच्या दुकानांना लक्ष्य केले. वाहनांची जाळपोळही करण्यात आली. फ्रान्सचे पंतप्रधान सेबास्टियन लेकोर्नू यांनी सरकार हिंसाचारापुढे झुकणार नसल्याचे सांगितले. राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनीही हिंसक कृत्यांमध्ये सहभागी असलेल्यांवर कारवाई करण्याचे आश्वासन दिले. Europe Protests 2026
 
सरकारच्या माहितीनुसार, आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सुमारे १,२०० जणांना अटक करण्यात आली असून, शनिवारी १५० हून अधिक पोलीस कर्मचारी जखमी झाले. Europe Protests 2026
 
अल्बानियात पाचव्या दिवशीही आंदोलन; पोलिसांकडून रबर बुलेट्स
 
अल्बानियाची राजधानी तिराना येथे सरकारविरोधी आंदोलन सलग पाचव्या दिवशीही सुरू राहिले. पंतप्रधान एडी रामा यांच्या राजीनाम्याची मागणी करत आंदोलक रस्त्यावर उतरले. परिस्थिती बिघडल्यानंतर पोलिसांनी रबर बुलेट्स, अश्रुधूर, पाण्याचा मारा आणि लाठीचार्जचा वापर केला. आंदोलकांनी पोलिसांवर दगड आणि पेट्रोल बॉम्ब फेकल्याचे वृत्त आहे. काही ठिकाणी वाहने आणि कचराकुंड्यांना आग लावण्यात आली.
 
मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी झालेल्या संघर्षात ३५ जण जखमी झाले. यामध्ये १८ पोलीस कर्मचारी आणि १७ आंदोलकांचा समावेश होता. पोलीस प्रमुख स्केंडर हिता यांच्या माहितीनुसार, पाच दिवसांतील हिंसाचारात १३२ पोलीस कर्मचारी जखमी झाले असून, १६७ जणांना अटक करण्यात आली आहे. Europe Protests 2026
 
इटलीत महागाई आणि युद्धविरोधी मोर्चाला हिंसक वळण
 
इटलीतील मिलान शहरात युद्ध आणि वाढत्या महागाईविरोधात काढण्यात आलेल्या मोर्चादरम्यान हिंसाचार झाला. चेहऱ्यावर मास्क घातलेल्या काही आंदोलकांनी पोलिसांवर दगड आणि रस्त्यावरील फरशीचे तुकडे फेकले. काही ठिकाणी बॅरिकेड्स पेटवण्यात आले, तर दुकानांमध्ये लूटमार झाल्याचे वृत्त आहे. Europe Protests 2026
 
पोलिसांनी जमावाला पांगवण्यासाठी अश्रुधूर आणि पाण्याच्या फवाऱ्यांचा वापर केला. परिस्थितीमुळे पियाझा डेल डुओमो परिसरातील काही भाग आणि एका महागड्या दुकानातील लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले.
 
स्थानिक समाज माध्यमांच्या माहितीनुसार, या संघर्षात किमान दोन पोलीस कर्मचारी जखमी झाले आणि सुमारे ५० आंदोलकांना ताब्यात घेण्यात आले. इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी हिंसाचाराचा निषेध केला. आंदोलन करणे हा नागरिकांचा अधिकार असला, तरी सार्वजनिक मालमत्तेची तोडफोड करणे योग्य नसल्याचे त्यांनी म्हटले. Europe Protests 2026
 
मिलानचे महापौर ज्युसेप्पे साला यांनीही नागरिकांच्या तक्रारी समजून घेणे आवश्यक असल्याचे सांगितले; मात्र हिंसक मार्गाचा अवलंब करण्यास विरोध दर्शवला.
 
पोर्तुगालमध्ये घरांच्या वाढत्या किमतींविरोधात मोर्चे
 
पोर्तुगालची राजधानी लिस्बन येथे हजारो नागरिक घरांच्या वाढत्या किमती आणि दैनंदिन खर्चाविरोधात रस्त्यावर उतरले. घर खरेदी करणे आणि भाडे भरणे सामान्य कुटुंबांसाठी कठीण होत असल्याची आंदोलकांची तक्रार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पोर्तुगालमध्ये २०१७ पासून घरांच्या किमती दुप्पट झाल्या आहेत. त्यामुळे परवडणाऱ्या घरांचा प्रश्न देशातील प्रमुख सामाजिक आणि आर्थिक मुद्द्यांपैकी एक बनला आहे. Europe Protests 2026
 
बेल्जियममध्ये शिक्षणाच्या खर्चाविरोधात आंदोलन
 
बेल्जियमची राजधानी ब्रुसेल्स येथेही शेकडो नागरिकांनी आंदोलन केले. यामध्ये तरुण आणि विद्यार्थ्यांची संख्या मोठी होती. काही ठिकाणी आंदोलक आणि पोलिसांमध्ये झटापट झाल्याचे वृत्त आहे.
 
शिक्षणाचा वाढता खर्च आणि उच्च शिक्षण सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर जाण्याची शक्यता याविरोधात विद्यार्थी संघटनांनी आवाज उठवला. फ्रान्समधील आंदोलनाचाही या निदर्शनांवर प्रभाव असल्याचे सांगितले जात आहे. Europe Protests 2026
 
युरोपातील आंदोलनांमागे नेमके कारण काय? 
 
युरोपातील या आंदोलनांमागे महागाई, बेरोजगारी, घरांच्या वाढत्या किमती, शिक्षणाचा वाढता खर्च आणि सरकारच्या धोरणांविषयीचा असंतोष अशी विविध कारणे दिसून येतात.
 
विशेष म्हणजे, अनेक देशांमध्ये एकाच काळात नागरिकांचा असंतोष रस्त्यावर उतरलेला दिसत आहे. काही ठिकाणी या आंदोलनांना हिंसक वळण लागल्याने सरकारांसमोर कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचे आव्हान निर्माण झाले आहे. या सर्व घडामोडींमुळे युरोपातील सामाजिक आणि राजकीय परिस्थितीबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. Europe Protests 2026
 
 




मुंबई तरुण भारत वेब टीम

Hello, You must be familiar with the Nation First approach daily 'Mumbai Tarun Bharat' as a newspaper committed to fearless and nationalist ideals and constantly doing conscious journalism for it. The journey of four decades has been successful only because of your trust and cooperation. Dear readers, we have been making a successful effort to always be perfect in our commitment to the thoughts of the nation and the national interest...
 
Changing with time is essential for any organization. Daily 'Mumbai Tarun Bharat' has decided to take this role here too and make 'MahaMTB' available in the media for the new 'smart' generation. Today's youth, readers, and citizens are becoming more and more 'smart' day by day. And in today's 'smart' era, information is available in abundance in the Internet-enabled information explosion. However, there is a need for complementary knowledge to determine a modern role and approach that is compatible with culture, motionlessness and tradition.
 
That is why mahamtb.com, MahaMTB Mobile App', MahaMTB Youtube Channel, MahaMTB Facebook Page, MahaMTB Twitter, MahaMTB Instagram, MahaMTB Telegram, MahaMTB WhatsApp Group etc. through social media and advanced avatar content. We are coming before you. Role in the new era, 'smart' journalism with a view, 'smart' multimedia for the new era, and journalism for a 'smart' Maharashtra will be the side of the game.
 
Now get all the updates in one click! mahamtb.com
संबंधित मजकूर