दसऱ्याला दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी शिवसेनेचे मदत ट्रक रवाना होणार; डोंबिवलीत एकनाथ शिंदेंची घोषणा

    18-Oct-2026

Eknath Shinde Farmers Aid 
 
ठाणे, : (Eknath Shinde Farmers Aid)दुष्काळाच्या झळांनी होरपळणाऱ्या शेतकरी कुटुंबांच्या मदतीसाठी शिवसेना पुढे सरसावली असून, दसरा मेळाव्याच्या दिवशी दुष्काळग्रस्त भागांतील शेतकऱ्यांसाठी दिवाळीचा शिधा घेऊन जाणारे ट्रक रवाना करण्यात येणार आहेत. शेतकरी कुटुंबांना संकटातून बाहेर काढण्यासाठी सर्वतोपरी मदत केली जाईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. शेतकरी कुटुंबांतील महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी शिलाई मशीनचे वाटप, तसेच शेतकऱ्यांच्या मुलींच्या विवाहासाठीही मदत करण्यात येणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.(Eknath Shinde Farmers Aid)
 
डोंबिवलीतील डीएनसी शाळेच्या मैदानावर खासदार डॉ. श्रीकांत शिंदे फाऊंडेशन आणि श्री नवदुर्गा युवा मंडळाच्या वतीने आयोजित शारदीय नवरात्रोत्सवाला शनिवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट दिली. यावेळी देवीचे दर्शन घेतल्यानंतर त्यांनी उपस्थितांशी संवाद साधला. दुष्काळाचे संकट दूर होऊन बळीराजाच्या जीवनात सुख-समृद्धी नांदावी, अशी प्रार्थना त्यांनी देवीचरणी केली.(Eknath Shinde Farmers Aid)
 
दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी उत्सवाच्या निधीचा विनियोग
 
खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या संकल्पनेतून आयोजित या नवरात्रोत्सवात पारंपरिक दांडियाऐवजी भजनसंध्या आणि संगीत कार्यक्रमांवर भर देण्यात आला आहे. रासरंग दांडिया उत्सवासाठी नियोजित निधी दुष्काळग्रस्त भागांतील शेतकऱ्यांच्या मदतीसाठी देण्यात येत आहे. उत्सवाच्या माध्यमातून भक्ती आणि सांस्कृतिक परंपरेसोबतच सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.(Eknath Shinde Farmers Aid)
 
दुष्काळग्रस्त शेतकरी कुटुंबांतील महिलांना शिलाई मशीन दिल्याने त्यांना उत्पन्नाचे साधन उपलब्ध होऊन कुटुंबाच्या उदरनिर्वाहाला हातभार लावता येईल. तसेच शेतकऱ्यांच्या मुलींच्या विवाहासाठी मदत करण्यात येणार आहे. दसरा मेळाव्याच्या दिवशी दिवाळीचा शिधा घेऊन जाणारे मोठ्या संख्येने ट्रक रवाना करून संकटात सापडलेल्या कुटुंबांची दिवाळी गोड करण्याचा प्रयत्न असल्याचे शिंदे यांनी स्पष्ट केले.(Eknath Shinde Farmers Aid)

मदतीसाठी समाजाने एकत्र यावे
 
शेतकरी हा ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असून, संकटाच्या काळात त्याला आधार देणे ही समाजातील प्रत्येक घटकाची जबाबदारी आहे. दुष्काळामुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकरी कुटुंबांना दिलासा देण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे पुढे यावे, असे आवाहन शिंदे यांनी केले. यावेळी शिवसेनेच्या स्थानिक नगरसेवकांनी, पदाधिकाऱ्यांनी आणि विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी मदतनिधीचे धनादेश त्यांच्याकडे सुपूर्द केले.(Eknath Shinde Farmers Aid)
 
भजनसंध्येतून कोकणी लोकसंस्कृतीचा जागर
 
नवरात्रोत्सवात कोकणातील विविध भजन मंडळांनी सादर केलेल्या देवीच्या भजनांनी, गणेशभजनांनी आणि पारंपरिक भक्तिगीतांनी परिसर भक्तिमय झाला. मालवणी भाषेत दुष्काळग्रस्त बळीराजाच्या सुख-समृद्धीसाठी देवीचरणी गाऱ्हाणेही घालण्यात आले. महाराष्ट्राच्या संतपरंपरेचा आणि सांस्कृतिक वारशाचा उल्लेख करत, अशा उपक्रमांमुळे समाज एकत्र येतो आणि पुढील पिढीपर्यंत संस्कृती पोहोचते, असे शिंदे म्हणाले.
खासदार डॉ. श्रीकांत शिंदे हे विकासकामांसोबतच सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रमांतून समाजाशी जोडलेले आहेत, असे नमूद करत एकनाथ शिंदे यांनी नवरात्रोत्सवाच्या आयोजनाबद्दल त्यांचे आणि सहकाऱ्यांचे अभिनंदन केले.(Eknath Shinde Farmers Aid)
 




संबंधित मजकूर