मुंबई, :(Devendra Fadnavis Regime Change)लोकशाही मार्गाने निवडणुकीतून सत्ता मिळवण्याची शक्यता नसल्यामुळेच काही जणांकडून देशात ‘रेजीम चेंज’ अर्थात सत्ताबदलाची भाषा केली जात असल्याचा आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. देशात अराजकता निर्माण करून सत्ता मिळवण्याचा प्रयत्न असल्याचा दावा करत त्यांनी विरोधकांवर निशाणा साधला. तसेच, मतदारयाद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणाला (एसआयआर) होणाऱ्या विरोधावरही त्यांनी प्रश्न उपस्थित केले.(Devendra Fadnavis Regime Change)
मुख्यमंत्री फडणवीस यांनी या संदर्भात भूमिका मांडताना, लोकशाही मार्गाने पात्र मतदारांच्या मतांच्या माध्यमातून निवडून येण्याची शक्यता दिसत नसल्यामुळेच संबंधितांच्या तोंडून ‘रेजीम चेंज’ची भाषा बाहेर पडल्याचे म्हटले. “सत्ता उलथून टाकायची आहे, पण लोकशाही मार्गाने नव्हे,” अशा शब्दांत त्यांनी विरोधकांच्या भूमिकेवर टीका केली. एसआयआरला होणारा विरोध हा केवळ निमित्त असून, खरा विरोध पात्र मतदारांच्या मतदानाच्या अधिकाराला असल्याचा आरोपही फडणवीस यांनी केला. मतदारयाद्यांचे पुनरीक्षण ही लोकशाही प्रक्रियेतील महत्त्वाची बाब असल्याचे सांगत त्यांनी या प्रक्रियेचे समर्थन केले.(Devendra Fadnavis Regime Change)
“त्यांना एसआयआर का नकोय? कारण त्यांना ‘रेजीम’ बदलायची आहे,” असे म्हणत फडणवीस यांनी विरोधकांच्या हेतूंवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. लोकशाही व्यवस्था आणि निवडणूक प्रक्रियेच्या विश्वासार्हतेच्या मुद्द्यावर त्यांनी भर दिला. लोकशाही हवी की ‘रेजीम चेंज’ची भाषा करणारे, हा निर्णय जनतेने घ्यायचा आहे, असे आवाहन करत फडणवीस यांनी लोकशाहीच्या संरक्षणासाठी एसआयआर आवश्यक असल्याची भूमिका मांडली.(Devendra Fadnavis Regime Change)
मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.