मुंबई, :( Mumbai Metro Timings)मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) दहिसर ते गुंदवली मेट्रो ७, दहिसर ते अंधेरी पश्चिम मेट्रो २ अ, काशीगाव ते दहिसर मेट्रो ९ (टप्पा १) आणि मंडाले ते चेंबूर मेट्रो २ब (टप्पा १) मार्गिकांवरील सेवा कालावधीत नवरात्रीनिमित्त रात्रीच्या वेळेस वाढ करण्यात आली आहे.( Mumbai Metro Timings)
गरबा आणि दांडियाचे कार्यक्रम संपल्यानंतर नागरिकांना घरी जाणे सोयीचे व्हावे, यासाठी मुंबईतील चार मेट्रो मार्गिकांच्या वेळेत वाढ करण्याचा निर्णय मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) घेतला आहे. त्यानुसार, १६ ते २० ऑक्टोबर या कालावधीत संबंधित मेट्रो मार्गिकांवर रात्री १२.३० वाजेपर्यंत सेवा सुरू राहणार आहे. या निर्णयामुळे रात्री उशिरा प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.( Mumbai Metro Timings)
चार मेट्रो मार्गिकांवर अतिरिक्त सेवा
एमएमआरडीएच्या निर्णयानुसार, दहिसर ते गुंदवली मेट्रो ७, दहिसर ते अंधेरी पश्चिम मेट्रो २ अ, काशीगाव ते दहिसर मेट्रो ९ (पहिला टप्पा) आणि मंडाले ते चेंबूर मेट्रो २ ब (पहिला टप्पा) या चार मार्गिकांवरील मेट्रो सेवा वाढवण्यात येणार आहे. नवरात्रीच्या शेवटच्या पाच दिवसांत रात्री उशिरापर्यंत मेट्रो उपलब्ध असल्याने गरबा आणि दांडियासाठी बाहेर पडणाऱ्या नागरिकांना दिलासा मिळणार आहे.( Mumbai Metro Timings)
अतिरिक्त फेऱ्यांचे नियोजन
प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन या कालावधीत दर १५ मिनिटांच्या अंतराने अतिरिक्त मेट्रो फेऱ्या चालवण्यात येणार आहेत. मेट्रो २ अ मार्गिकेवर १० अतिरिक्त फेऱ्या, तर मेट्रो ७ आणि मेट्रो ९ मार्गिकांवर प्रत्येकी १४ अतिरिक्त फेऱ्या चालवल्या जाणार आहेत. तसेच, मेट्रो २ ब मार्गिकेवर १५ अतिरिक्त फेऱ्यांचे नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे रात्रीच्या वेळी प्रवाशांना मेट्रोची सेवा अधिक काळ उपलब्ध होणार आहे.( Mumbai Metro Timings)
मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.