ठाकरेंच्या दसरा मेळाव्यावर अटींचे बंधन; शिवाजी पार्क मैदानात परवानगी पण अटी पाळणे बंधनकारक

    17-Oct-2026


Uddhav Thackeray Dussehra Rally

मुंबई, : (Uddhav Thackeray Dussehra Rally)विजयादशमीच्या दिवशी दरवर्षीप्रमाणे यंदाही दादरच्या शिवाजी पार्क मैदानावर उबाठा गटाचा दसरा मेळावा होणार आहे. मात्र, उबाठा गटाला शिवाजी पार्क मैदानावर दसरा मेळावा घेण्याची परवानगी मिळाली असली तरी, तब्बल २४ अटीशर्थींचे पालन करणे बंधनकारक आहे.(Uddhav Thackeray Dussehra Rally)
 
हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्यापासून शिवसेनेच्या दसरा मेळाव्याची परंपरा सुरु झाली. पुढे शिवसेनेत फूट पडल्यानंतर आता दरवर्षी उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांचा वेगवेगळा दसरा मेळावा पार पडतो. दरम्यान, यंदा बृहन्मुंबई महानगरपालिकेने उबाठा गटाला शिवाजी पार्क मैदानावर दसरा मेळाव्यासाठी अधिकृत परवानगी दिली आहे.(Uddhav Thackeray Dussehra Rally)
 
पालिकेच्या पत्रानुसार, २० ऑक्टोबर रोजी मुख्य दसरा मेळाव्यासाठी आणि १९ ऑक्टोबर रोजी पूर्वतयारीसाठी अशी २ दिवसांची परवानगी देण्यात आली आहे. मात्र, यासाठी पालिकेने २४ अटी-शर्ती घातल्या आहेत. या अटींचा भंग झाल्यास सहाय्यक आयुक्त (जी/उत्तर) यांना परवानगी रद्द करण्याचा अंतिम अधिकार असेल.(Uddhav Thackeray Dussehra Rally)
 
'त्या' २४ अटी कोणत्या?
 
दसरा मेळाव्यासाठी महापालिकेने २४ अटी घातल्या आहेत. यात दि. १९ ऑक्टोबर रोजी तयारीसाठी आणि २० ऑक्टोबर रोजी मुख्य कार्यक्रमासाठी मैदान वापरता येईल. २० तारखेला सकाळी ६ ते रात्री १२ या वेळेतच मैदान मिळेल. मैदाने प्रतिदिन भाडे ५०० रुपये आणि १८ टक्के जीएसटी तसेच २५० रुपये परवाना शुल्क आगाऊ भरावे लागेल. २० हजार रुपये अनामत रक्कमही आगाऊ भरावी लागेल. कोणत्याही कारणाने पालिकेने परवानगी रद्द केल्यास कोणताही दावा किंवा भरपाई मागता येणार नाही. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मैदान हे सायलेन्स झोन आहे, त्याचे पालन करणे बंधनकारक असेल. रात्री १० नंतर कोणत्याही प्रकारे लाऊडस्पीकर वापरता येणार नाही. ध्वनिप्रदूषण नियमांचे काटेकोर पालन करणे बंधनकारक असेल. शिवाजी पार्क मैदानाच्या आत कोणत्याही वाहनास प्रवेश नाही. पार्किंग करता येणार नाही. मैदानात कोणतेही खोदकाम, खड्डा करणे, खिळे ठोकणे आणि नुकसान करण्यास मनाई असेल. कार्यक्रमानंतर कचरा, घाण, निर्माल्य स्वतः उचलून मैदान स्वच्छ करावे लागेल. कार्यक्रम संपल्यानंतर मैदान आहे त्या स्थितीत पूर्ववत करून द्यावे लागेल. मैदानाचे नुकसान झाल्यास अनामत रक्कम जप्त होईल आणि पुढील वर्षी परवानगी नाकारली जाईल.(Uddhav Thackeray Dussehra Rally)
 
मुंबई पोलीस, वाहतूक पोलीस, अग्निशमन दलाची स्वतंत्र परवानगी घेणे बंधनकारक असेल. कोणतेही पक्के बांधकाम, स्टेजसाठी खोदकाम करता येणार नाही. जाहिरात, बॅनर लावायचे असल्यास जाहिरात विभागाची स्वतंत्र परवानगी घ्यावी लागेल. कायदा व सुव्यवस्थेची संपूर्ण जबाबदारी आयोजकाची राहील. परिस्थिती बिघडल्यास परवानगी तात्काळ रद्द करण्यात येईल. ही परवानगी केवळ मैदान वापरण्यापुरती आहे, इतर कोणत्याही परवान्याचा यात समावेश नाही. मैदानात स्वयंपाक करणे, चूल पेटवणे, अग्नीचा वापर करण्यास मनाई असेल. रस्ता, फूटपाथवर अतिक्रमण करता येणार नाही, जनतेस अडथळा होता कामा नये. विद्युत जोडणीसाठी नियमानुसार परवानगी घ्यावी, सुरक्षिततेची काळजी घ्यावी. नैसर्गिक कारणाने, पावसामुळे कार्यक्रम रद्द झाल्यास पालिका जबाबदार नाही. कार्यक्रमात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची सुरक्षा, विमा आयोजकाची जबाबदारी असेल. कोणतेही आक्षेपार्ह भाषण, गोंधळ होणार नाही याची काळजी घ्यावी. ही परवानगी दुसऱ्या कोणालाही हस्तांतरित करता येणार नाही. या सर्व अटींचा भंग झाल्यास सहाय्यक आयुक्त (जी/उत्तर) यांना परवानगी रद्द करण्याचा अंतिम अधिकार राहील.(Uddhav Thackeray Dussehra Rally)
 




संबंधित मजकूर