ठाण्यात कारवर लोखंडी सांगाडा कोसळला; कंत्राटदाराला एमएमआरडीएचा २ कोटींचा दंड

आनंद नगर–साकेत उन्नत मार्ग प्रकल्पस्थळी दुर्घटना; जीवितहानी नाही, सुरक्षेतील त्रुटींच्या चौकशीचे आदेशThane Elevated Road Accident

    17-Oct-2026

Thane Elevated Road Accident
 
ठाणे, : (Thane Elevated Road Accident)ठाण्यातील आनंद नगर–साकेत उन्नत मार्ग प्रकल्पाच्या ठिकाणी एक दुर्दैवी घटना घडली आहे. कोपरी पुलावरून जात असलेल्या एका कारवर बांधकाम सुरू असलेल्या खांबाचा लोखंडी सळ्यांचा सांगाडा (रिइन्फोर्समेंट केज) कोसळल्याने कारच्या पुढील काचेचे नुकसान झाले. सुदैवाने, या घटनेत कोणालाही दुखापत झालेली नाही.(Thane Elevated Road Accident)
 
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने या घटनेची अत्यंत गंभीर दखल घेतली आहे. अशा घटना कोणत्याही परिस्थितीत स्वीकारार्ह नाहीत. बांधकामाच्या ठिकाणी सुरक्षेच्या उपाययोजनांमध्ये कोणत्याही प्रकारचा निष्काळजीपणा खपवून घेतला जाणार नाही.(Thane Elevated Road Accident)
 
नुकसानग्रस्त वाहन घटनास्थळावरून हटविण्यात आले असून, कोसळलेला लोखंडी सांगाडा क्रेनच्या साहाय्याने सुरक्षितपणे हटविण्याचे काम सुरू आहे.
 
या घटनेप्रकरणी एमएमआरडीएने प्रकल्पाचे काम करणाऱ्या कंत्राटदारावर २ कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. तसेच, घटनेचे नेमके कारण आणि सुरक्षाविषयक त्रुटींचा शोध घेण्यासाठी सखोल चौकशीचे आदेश यापूर्वीच देण्यात आले आहेत. भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी आवश्यक त्या सुधारात्मक उपाययोजनांची कठोर अंमलबजावणी करण्यात येईल.(Thane Elevated Road Accident)
 
नागरिकांची सुरक्षितता ही एमएमआरडीएची सर्वोच्च प्राथमिकता असून, प्रत्येक प्रकल्पाच्या ठिकाणी सुरक्षा नियमांचे काटेकोर पालन आणि जबाबदारी निश्चित केली जाईल.(Thane Elevated Road Accident)




संबंधित मजकूर