_202610171828444074_H@@IGHT_350_W@@IDTH_696.jpg)
ठाणे, :(Pratap Sarnaik Purnekar Family)प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात १८ दिवसांनंतर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी पूर्णेकर कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले. या प्रकरणात दोषींना कठोर शिक्षा व्हावी, यासाठी शिवसेनेच्या वतीने अनुभवी ज्येष्ठ वकिलांची मदत उपलब्ध करून देण्याची घोषणा सरनाईक यांनी केली. तसेच कुटुंबीयांच्या सुरक्षेबाबत आवश्यक ती व्यवस्था करण्याच्या सूचनाही पोलिसांना दिल्याचे त्यांनी सांगितले.(Pratap Sarnaik Purnekar Family)
पूर्णेकर कुटुंबीयांशी आपले अनेक वर्षांपासून कौटुंबिक संबंध असल्याचे सांगत सरनाईक यांनी या कठीण प्रसंगी त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याची ग्वाही दिली. भेटीदरम्यान त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी फोनवरून संपर्क साधून कुटुंबीयांचे त्यांच्याशी बोलणे करून दिले. शिंदे यांनीही कुटुंबीयांना धीर देत शिवसेना त्यांच्या पाठीशी असल्याचे आश्वासन दिले.(Pratap Sarnaik Purnekar Family)
न्यायासाठी ज्येष्ठ वकिलांची मदत
या हत्या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी होऊन दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे, अशी भूमिका सरनाईक यांनी मांडली. पूर्णेकर कुटुंबीयांना न्याय मिळवून देण्यासाठी आवश्यकतेनुसार ज्येष्ठ वकील आणि सीनियर कौन्सिल उपलब्ध करून देण्याची जबाबदारी आपण घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले. कुटुंबीयांच्या सुरक्षेच्या मागण्यांची दखल घेऊन आवश्यक ती व्यवस्था करण्याच्या सूचनाही संबंधित पोलिस अधिकाऱ्यांना दिल्याचे त्यांनी सांगितले.(Pratap Sarnaik Purnekar Family)
भेटीस उशीर झाल्याबद्दल दिलगिरी
घटनेनंतर १८ दिवसांनी भेट घेतल्याबद्दल सरनाईक यांनी दिलगिरी व्यक्त केली. ठाण्यातील तणावपूर्ण वातावरण आणि अनुचित प्रकार घडू नये, या दृष्टीने योग्य वेळ साधून भेट घेण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मात्र, भेटीस विलंब झाला असला तरी कुटुंबीयांना न्याय मिळवून देण्यासाठी आवश्यक ती मदत केली जाईल, असे त्यांनी सांगितले.
या प्रकरणाचे राजकारण करण्यापेक्षा पीडित कुटुंबाला आधार देणे, त्यांच्या सुरक्षेची काळजी घेणे आणि कायदेशीर लढ्यासाठी मदत करणे महत्त्वाचे असल्याचे सरनाईक यांनी नमूद केले. तपासावर लक्ष ठेवून दोषींवर कायद्यानुसार कारवाई होण्यासाठी पाठपुरावा केला जाईल, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.(Pratap Sarnaik Purnekar Family)