४५ बोअरवेलचे पाणी दूषित; २२९ बोअरवेलच्या सर्वेक्षणात गंभीर बाब उघड

दोन नमुन्यांत क्रोमियमचे प्रमाण मर्यादेच्या ९०० पटNashik Groundwater Pollution

    17-Oct-2026


Nashik Groundwater Pollution

 
नाशिक, : (Nashik Groundwater Pollution)नळाला नियमित पाणी नाही, म्हणून बोअरवेलचा आधार घ्यायचा; पण त्याच पाण्यात घातक रसायनांचे अंश आढळल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. अंबड औद्योगिक वसाहतीजवळील परिसरात नाशिक महापालिकेने केलेल्या सर्वेक्षणात २२९ बोअरवेलपैकी ४५ बोअरवेलमधून पिवळसर, दूषित पाणी येत असल्याचे आढळले आहे. या निष्कर्षामुळे परिसरातील भूजलाच्या सुरक्षिततेबाबत चिंता वाढली आहे.(Nashik Groundwater Pollution)
 
क्रोमियमचे प्रमाण मर्यादेच्या ९०० पट
 
महापालिकेने केलेल्या सर्वेक्षणात ८,८८७ घरांतील ३४,३९९ नागरिकांचा समावेश होता. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने तपासलेल्या दोन भूजल नमुन्यांमध्ये क्रोमियमचे प्रमाण ४५ मिलीग्रॅम प्रतिलिटर आढळले. पिण्याच्या पाण्यासाठी नमूद केलेली मर्यादा ०.०५ मिलीग्रॅम प्रतिलिटर असल्याने हे प्रमाण सुमारे ९०० पट अधिक आहे, प्राथमिक तपासात अंबड एमआयडीसीतील औद्योगिक सांडपाण्यामुळे भूजल दूषित झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. मात्र, प्रदूषणाचा नेमका स्रोत आणि त्याची व्याप्ती निश्चित करण्यासाठी पुढील तपास महत्त्वाचा आहे.(Nashik Groundwater Pollution)
  
बाधित बोअरवेलचे पाणी वापरू नका
 
प्रशासनाने संबंधित बोअरवेलचे पाणी वापरणे टाळण्याचे आवाहन केले असून बाधित भागात टँकरद्वारे सुरक्षित पाणीपुरवठा सुरू केला आहे, तसेच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने १७ इलेक्ट्रोप्लेटिंग उद्योगांना बंद करण्याच्या नोटिसा बजावली असून आता बाधित बोअरवेलची स्पष्ट यादी, नियमित पर्यायी पाणीपुरवठा आणि भूजलाच्या पुनर्तपासणीचे निष्कर्ष नागरिकांसमोर ठेवणे आवश्यक आहे(Nashik Groundwater Pollution)
 
दूषित बोअरवेल किती आणि कारवाई काय?
 
· २२९ बोअरवेलचे सर्वेक्षण करण्यात आले.
· त्यापैकी ४५ बोअरवेलमधून पिवळसर, दूषित पाणी येत असल्याचे आढळले.
· संबंधित बोअरवेलचे पाणी वापरणे टाळण्याचे आवाहन करण्यात आले.
· बाधित भागांत टँकरद्वारे पर्यायी पाणीपुरवठा सुरू करण्यात आला.
· प्रदूषण नियंत्रण मंडळाने १७ इलेक्ट्रोप्लेटिंग उद्योगांना बंद करण्याच्या नोटिसा दिले.(Nashik Groundwater Pollution)
 




संबंधित मजकूर