नाशिकच्या हवेत धुळीचा विळखा! बांधकामांमुळे प्रदूषणाचा धोका; हवा गुणवत्ता तपासण्याची गरज

१५ ऑक्टोबरला अंबडमध्ये AQI ११६; रस्त्यांवरील धूळ नियंत्रण आणि प्रदूषणाच्या नियमित मोजमापाची मागणीNashik Air Pollution

    17-Oct-2026


Nashik Air Pollution

नाशिक, :(Nashik Air Pollution)सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरात सुरू असलेली पायाभूत सुविधांची कामे, रस्त्यांवरील धूळ आणि वाढती वाहनांची वर्दळ यांमुळे नाशिकच्या हवेच्या गुणवत्तेचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला असून विकासकामे वेगाने सुरू असली तरी त्यामुळे नागरिकांना प्रदूषणाचा त्रास होऊ नये, यासाठी बांधकामस्थळी धूळ नियंत्रणाच्या उपाययोजना काटेकोरपणे राबविण्याची गरज नागरिकांनी व्यक्त केली आहे.(Nashik Air Pollution)
 
अंबडमध्ये ११६, तर इतर भागांत वेगवेगळे निर्देशांक
 
१५ ऑक्टोबर २०२६ रोजी उपलब्ध निरीक्षण केंद्रांच्या आकडेवारीनुसार, अंबड परिसरात हवा गुणवत्ता निर्देशांक (AQI) ११६, हिरावाडी येथे ८०, तर शिवाजीनगर परिसरात १०२ नोंदविण्यात आले आहे. हे आकडे संबंधित निरीक्षण केंद्रांच्या नोंदींवर आधारित असून त्यामुळे संपूर्ण शहराचा निर्देशांक १५२ झाला असून त्याचमुळे हवेची गुणवत्ता घसरून त्याचा परिणाम शहरवासीयांवर होऊन श्वसनाचे आजार वाढले असल्याचा दावा समाजमध्यमांमद्धे केला जात आहे, केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या (CPCB) वर्गीकरणानुसार, १०१ ते २०० हा AQI स्तर ‘मध्यम’ श्रेणीत येतो.(Nashik Air Pollution)
 
खोदकामाच्या ठिकाणी धूळ नियंत्रण आवश्यक
 
रस्त्यांची कामे, मातीची वाहतूक आणि वाहनांची वर्दळ यांमुळे हवेत धूलिकण पसरू शकतात. त्यामुळे खोदकामाच्या ठिकाणी नियमित पाणी फवारणी, बांधकाम साहित्य झाकून ठेवणे, रस्त्यांची यांत्रिक स्वच्छता आणि वाहनांमधून धूळ उडू नये यासाठी उपाययोजना करण्याची मागणी ही नागरिकांकडून होत आहे.(Nashik Air Pollution)
 
प्रदूषणाच्या आकडेवारीची पारदर्शकता हवी
 
सध्या नाशिक शहरामध्ये सोशल मीडियावर प्रदूषणाबाबत नागरिकांच्या तक्रारी किंवा चिंता व्यक्त होत असल्या, तरी नाशिकमध्ये श्वसनविकारांच्या रुग्णांत ३५ टक्के वाढ झाल्याची अधिकृत पुष्टी प्रशासनाने केलेली नाही त्यामुळे महापालिका आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाने निरीक्षण केंद्रनिहाय आकडेवारी, प्रमुख प्रदूषक आणि धूळ नियंत्रणासाठी केलेल्या कारवाईची माहिती नियमितपणे सार्वजनिक करावी आणि त्याचबरोबर सिंहस्थाची तयारी आणि नागरिकांचे आरोग्य यांचा समतोल राखण्यासाठी विकासकामांबरोबरच हवेच्या गुणवत्तेवरही लक्ष ठेवावे असे मत पर्यावरणतज्ञांनी व्यक्त केले आहे(Nashik Air Pollution)
 




संबंधित मजकूर