औषधनिर्मिती संशोधनासाठी महाराष्ट्रात पोषक वातावरण; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन

ॲस्ट्राझेनेका फार्मा इंडियाच्या मुंबईतील नव्या मुख्यालयाचे उद्घाटन; जागतिक संशोधन आणि विद्यापीठांशी भागीदारीवर भरMaharashtra Pharma Research


Maharashtra Pharma Research

 
मुंबई,: (Maharashtra Pharma Research)औषधनिर्मिती क्षेत्रातील संशोधन, नावीन्य आणि जागतिक सहकार्याला चालना देण्यासाठी महाराष्ट्रात अनुकूल वातावरण निर्माण केले जात आहे. आरोग्यसेवा अधिक सुलभ, परवडणारी आणि दर्जेदार करण्यासाठी नावीन्यपूर्ण संशोधनाला प्राधान्य देणे आवश्यक आहे,असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. मुंबई येथे ॲस्ट्राझेनेका फार्मा इंडिया लिमिटेडच्या नवीन मुख्यालयाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते करण्यात आले. या नव्या मुख्यालयामुळे औषध संशोधन आणि आरोग्य क्षेत्रातील जागतिक सहकार्याला बळ मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.(Maharashtra Pharma Research)
कोविड-१९ महामारीच्या काळात भारताने ‘कोविड मैत्री’ उपक्रमांतर्गत ९९ देशांना लसींचा पुरवठा करून ‘वसुधैव कुटुंबकम्’ची भावना जगासमोर मांडली. या प्रयत्नांमध्ये ॲस्ट्राझेनेकाचे योगदानही मोलाचे होते, असे मुख्यमंत्री म्हणाले. कर्करोगावरील उपचार अधिक प्रभावी करण्यासाठी तसेच कर्करोगामुळे होणारे मृत्यू अत्यंत दुर्मीळ करण्याच्या दिशेने कंपनी करत असलेले संशोधन महत्त्वपूर्ण असल्याचे त्यांनी नमूद केले.(Maharashtra Pharma Research)
अमेरिका आणि युरोपसारख्या कठोर नियामक निकष असलेल्या बाजारपेठांमध्ये भारतीय औषधे, विशेषतः जेनेरिक औषधे, प्रभावी कामगिरी करत आहेत. यावरून भारतीय औषधनिर्मिती उद्योगाची जागतिक दर्जाची क्षमता स्पष्ट होते. देशात बल्क ड्रग पार्क विकसित करण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न औषधनिर्मिती क्षेत्रासाठी महत्त्वाचा ठरणार आहे. हे पार्क कार्यान्वित झाल्यानंतर या क्षेत्रात मोठे परिवर्तन घडण्याची अपेक्षा आहे, असे फडणवीस यांनी सांगितले. औषधनिर्मिती, वैद्यकीय सेवा आणि वैद्यकीय तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात नावीन्यपूर्ण संशोधनामुळे वेगाने बदल होत आहेत. अचूक निदान, प्रभावी उपचार आणि आधुनिक औषधांच्या माध्यमातून नागरिकांचे आरोग्य व जीवनमान सुधारण्यासाठी संशोधनाला प्रोत्साहन देणे गरजेचे असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.(Maharashtra Pharma Research)
वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या दौऱ्यादरम्यान स्वित्झर्लंडच्या आरोग्यमंत्र्यांशी झालेल्या चर्चेचा संदर्भ देत मुख्यमंत्र्यांनी आरोग्यसेवेतील संशोधन आणि तंत्रज्ञानाच्या महत्त्वावर भर दिला. ॲस्ट्राझेनेकाने महाराष्ट्रातील जागतिक दर्जाच्या शैक्षणिक संस्था आणि विद्यापीठांशी भागीदारी करावी. त्यामुळे संशोधनाला गती मिळण्यासोबतच तरुण संशोधकांच्या प्रतिभेचा उपयोग औषधनिर्मिती क्षेत्रातील नावीन्यासाठी करता येईल, असे आवाहन त्यांनी केले.(Maharashtra Pharma Research)
महाराष्ट्र सरकार उद्योगांसाठी अनुकूल वातावरण निर्माण करण्यास आणि कंपन्यांसोबत भागीदारीत काम करण्यास कटिबद्ध आहे. उद्योगांची वाढ झाली, तर राज्याच्या आर्थिक आणि औद्योगिक प्रगतीलाही चालना मिळते. त्यामुळे व्यवसायांच्या विस्तारासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यावर सरकारचा भर असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. या कार्यक्रमाला आमदार अतुल भातखळकर, ॲस्ट्राझेनेकाचे आशिया विभागाचे उपाध्यक्ष अरुण कृष्णा, ॲस्ट्राझेनेका इंडियाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक प्रवीण राव अक्किनेपल्ली यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.(Maharashtra Pharma Research)
 
 
 
 




गायत्री श्रीगोंदेकर

मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.
संबंधित मजकूर