'शेतकऱ्यांना पाच हजारांची किंमत कळते’; मुख्यमंत्री फडणवीसांचा विरोधकांना टोला


Fadnavis Farmer Aid

 
मुंबई, : (Fadnavis Farmer Aid)“मोठ्या बंगल्यांत राहणाऱ्या आणि महागड्या गाड्यांत फिरणाऱ्या नेत्यांना पाच हजार रुपयांची किंमत कळणार नाही; मात्र, आमच्या शेतकऱ्यांना या रकमेचे महत्त्व माहिती आहे,” अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या पाच हजार रुपयांच्या अग्रीम मदतीवरून टीका करणाऱ्या विरोधकांना प्रत्युत्तर दिले. दुष्काळी परिस्थितीत ही मदत मर्यादित असली, तरी शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा देणारी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.(Fadnavis Farmer Aid)
 
वर्धा येथे नागपूर पदवीधर मतदारसंघातील भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचे उमेदवार सुधाकर कोहळे यांच्या प्रचारासाठी आयोजित पदवीधर मेळाव्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस माध्यमांशी बोलत होते.
 
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "राज्याच्या इतिहासात डिसेंबरपूर्वी अशा प्रकारची मदत मिळाल्याचे उदाहरण नाही. एनडीआरएफच्या निकषांमुळे मदत लवकर देण्यात अडचणी असतानाही सरकारने मार्ग काढून शेतकऱ्यांना अग्रीम स्वरूपात पाच हजार रुपये दिले आहेत. शेतकऱ्यांचे दुःख मोठे असून, त्याच्या तुलनेत पाच हजार रुपये ही मोठी रक्कम नाही, याची जाणीव असल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी नमूद केले.मात्र, या मदतीतून शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.(Fadnavis Farmer Aid)
 
मदतीच्या रकमेचे महत्त्व स्पष्ट करताना त्यांनी शेतकऱ्यांना मिळणाऱ्या किमान मदतीचा संदर्भ दिला. “आतापर्यंत आपण जर बघितलं, तर ज्याच्याकडे कमी क्षेत्र आहे, अशा शेतकऱ्याला मिळणारे मिनिमम फक्त हजार रुपये असतात. आता अगदी छोट्या शेतकऱ्यालाही किमान पाच हजार रुपये मिळतील आणि बाकीच्यांना नंतर ज्यावेळेस कॉम्पेन्सेशन मिळेल, त्यावेळेस इतर पैसे मिळतील,” असे त्यांनी सांगितले.
 
कर्नाटक राज्यातील दुष्काळी परिस्थितीचा दाखला दिला. ते म्हणाले, “आपल्याच बाजूला कर्नाटक राज्य आहे. तिथेही इतकाच भीषण दुष्काळ आहे. त्यांनी केवळ दोन हजार रुपये दिले आहेत. त्यामुळे काँग्रेसचे नेते, जे ‘जीआर का काढत नाही, कर्नाटकने जीआर काढला, कर्नाटकने जीआर काढला,’ असे या ठिकाणी सांगत होते, आता मात्र ते मूग गिळून बसलेले आहेत.”(Fadnavis Farmer Aid)
 
मुख्यमंत्री फडणवीस यांनी छोट्या आर्थिक मदतीचे महत्त्व अधोरेखित केले. ते म्हणाले, “आम्ही जेव्हा लाडक्या बहिणींना १५०० रुपये दिले, तेव्हा हेच काँग्रेस आणि विरोधी पक्षाचे लोक होते, जे लाडक्या बहिणींना नावं ठेवत होते आणि दीड हजार रुपयांना नावं ठेवत होते. पण त्या लाडक्या बहिणींना दीड हजार रुपयांची किमंत माहिती होती. आमच्या शेतकऱ्यांना पाच हजार रुपयांची किंमत माहिती आहे.” पुढे विरोधकांवर टीका करताना ते म्हणाले, “जे मोठ्या मोठ्या बंगल्यात राहतात, मोठ्या मोठ्या गाड्यांत हिंडतात आणि ज्यांच्या अनेक संस्था आहेत अशा नेत्यांना पाच हजार रुपयांची किंमत कधीच कळू शकत नाही.”(Fadnavis Farmer Aid)
 
मायक्रोफायनान्स कंपन्यांबाबत बोलताना ते म्हणाले, “मायक्रोफायनान्सच्या संदर्भात काही तक्रारी आमच्याकडे येत आहेत. आम्ही त्या कंपन्यांनादेखील सूचना दिलेल्या आहेत की अवाजवी दबाव या दुष्काळाच्या काळात त्यांनी आणू नये. अवाजवी दबाव आणला, तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल,” असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले.(Fadnavis Farmer Aid)
 
 
 




गायत्री श्रीगोंदेकर

मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.
संबंधित मजकूर