
नवी दिल्ली : (Abhijeet Deepke Bail)कॉकरोच जनता पार्टी (CJP) चे संस्थापक अभिजीत दीपके यांना दिल्लीतील (SEM) न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला आहे. दि. १७ ऑक्टोबर २०२६ रोजी न्यायालयाने त्यांना ५०,००० रुपये रोख जामीन भरण्याचे आदेश दिले आहेत.
शुक्रवार दि. १६ ऑक्टोबर रोजी दिल्लीतील कनॉट प्लेस आणि इतर भागांत होणाऱ्या ‘लहरा दो तिरंगा’ या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी अभिजीत दीपके यांना ताब्यात घेतले आणि नंतर अटक केली.(Abhijeet Deepke Bail)
‘लहरा दो तिरंगा’ या कार्यक्रमापूर्वी आयसा (AISA) च्या राष्ट्रीय अध्यक्षा नेहा बोरा यांनाही ताब्यात घेण्यात आले होते; मात्र त्यांना शनिवारी सकाळी सोडण्यात आले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीत BNSS च्या कलम १२६ आणि १७० अंतर्गत जमावबंदी आदेशाचे उल्लंघन आणि सामाजिक शांतता भंग होण्याची शक्यता असल्याच्या आधारावर कनॉट प्लेससह विविध ठिकाणी एफआयआर नोंदवण्यात आल्याचे सांगितले जात आहे.(Abhijeet Deepke Bail)
न्यायालयाचा निर्णय :
शनिवार दि. १७ ऑक्टोबर रोजी दीपके यांना SEM न्यायालयासमोर हजर करण्यात आले. सुनावणीनंतर न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडीत पाठवण्याऐवजी सशर्त जामीन मंजूर केला.(Abhijeet Deepke Bail)
जामीनच्या मुख्य अटी :
५०,००० रुपयांचा जामीन.
पीस बॉन्ड म्हणजे शांतता राखण्याचे बंधपत्र स्वाक्षरीसह.
एक वर्षासाठी कोणतीही शांतता भंग करू नये.(Abhijeet Deepke Bail)