मुंबई, : (Vengurla Fish Seed Production Centre)वेंगुर्ला तालुक्यातील उभादांडा येथे देशातील पहिल्या बहुप्रजातीय मत्स्यबीज उत्पादन केंद्राचे भूमिपूजन राज्याचे पालकमंत्री तथा मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते उत्साहात पार पडले. हा प्रकल्प कोकण आणि सिंधुदुर्गच्या अर्थव्यवस्थेला नवी दिशा देणारा आणि स्थानिकांच्या आर्थिक समृद्धीचा मार्ग उजळवणारा ठरणार असल्याचे प्रतिपादन यावेळी मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी केले.(Vengurla Fish Seed Production Centre)
सध्या देशात मत्स्य उत्पादनात आंध्र प्रदेश राज्य अव्वल स्थानी असून तिथे वार्षिक ५५ लाख ३९ हजार टन मत्स्य उत्पादन होते आणि केवळ मत्स्य व्यवसायामुळे त्या राज्याला ७७ हजार ८५ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळते. या तुलनेत महाराष्ट्र सध्या ७ लाख ४३ हजार टन उत्पादन घेत असून राज्याचे उत्पन्न १२,७७५ कोटी रुपये आहे. आंध्र प्रदेशच्या धर्तीवर महाराष्ट्रातील मच्छिमारांनाही जागतिक स्पर्धेत उतरवून ताकद देण्यासाठी राज्य सरकारने मत्स्य व्यवसायाला 'कृषीचा दर्जा' दिला आहे. यामुळे जिल्हा बँक आणि इतर वित्तीय संस्थांमार्फत शेतकऱ्यांप्रमाणेच मच्छिमारांनाही सुलभपणे कर्ज आणि आर्थिक मदत उपलब्ध होणार आहे. तसेच पंतप्रधान मत्स्य संपदा योजनेच्या धर्तीवर राज्यात 'मुख्यमंत्री मत्स्य संपदा योजना' देखील लागू करण्यात आली आहे.(Vengurla Fish Seed Production Centre)
या कार्यक्रमात मत्स्योत्पादनासोबतच मत्स्य टाकाऊ पदार्थांपासून मूल्यवर्धन करण्यावरही मोठा भर देण्यात आला. मासे आणि कोळंबी सोलताना निघणाऱ्या कचऱ्यापासून कॉस्मेटिक्स उद्योगात वापरले जाणारे अत्यंत मूल्यवान 'कोलाजेन' तयार करण्याचे कारखाने उभे राहू शकतात. आंध्र प्रदेशातील एका प्रकल्पाचे उदाहरण देताना मंत्री महोदयांनी सांगितले की, ३० कोटींची गुंतवणूक करणाऱ्या एका कारखान्याला अमेरिकन कंपनीकडून तब्बल साडेचारशे कोटींची ऑफर मिळाली होती. याच धर्तीवर आपल्याकडील मत्स्य कचऱ्याचा सदुपयोग करून स्थानिकांना याद्वारे मोठा आर्थिक नफा मिळवून दिला जाईल.(Vengurla Fish Seed Production Centre)
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तरुणांना रोजगारासाठी जिल्ह्याबाहेर जाण्याची वेळ येऊ नये आणि स्थानिक पातळीवरच त्यांना रोजगाराच्या उत्तम संधी मिळाव्यात, यासाठी मत्स्य, पर्यटन आणि कृषी क्षेत्राच्या माध्यमातून दरडोई उत्पन्न वाढवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प १२ महिन्यांच्या आत म्हणजेच पुढील वर्षी १५ ऑक्टोबरपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले असून, उद्घाटनासाठी मुख्यमंत्री आणि इतर वरिष्ठ मंत्री येतील.(Vengurla Fish Seed Production Centre)
यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, मत्स्यव्यवसाय आयुक्त भानुदास पालवे, वेंगुर्ला पंचायत समितीचे सभापती शंकर घारे, सरपंच नीलेश चमणकर, सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी, अतिरिक्त मत्स्यव्यवसाय आयुक्त महेश देवरे, दक्षिण कोकण विभागाच्या विभागीय वन अधिकारी कांचन पवार, शास्त्रज्ञ पंकज पाटील, सहआयुक्त नागनाथ भादुले, सहायक आयुक्त मत्स्यव्यवसाय सागर कुवसेकर आदी उपस्थित होते.(Vengurla Fish Seed Production Centre)
मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.