शिवसेनेचा दसरा मेळावा दुष्काळग्रस्तांना समर्पित; पक्षाकडून टिझर रिलीज

    16-Oct-2026   


 
Shiv Sena Dussehra Rally
 
मुंबई, :(Shiv Sena Dussehra Rally)शिवसेनेचा यंदाचा दसरा मेळावा दुष्काळग्रस्तांना समर्पित करण्यात आला आहे. पक्षाकडून गुरुवारी दसरा मेळाव्याचा टिझर रिलीज करण्यात आला. दि. २० ऑक्टोबर रोजी संध्याकाळी ५ वाजता गोरेगावमधील नेस्को येथे शिवसेनेकडून दसरा मेळावा आयोजित करण्यात आला आहे.(Shiv Sena Dussehra Rally)
 
दरम्यान, या टिझरमध्ये दुष्काळाच्या संकटात सापडलेल्या शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडणार नाही, भगवा खांद्यावर घेऊन शिवसैनिक बांधावर जाईल. परिस्थिती गंभीर आहे पण पाठीशी उभा राहणारा शिवसैनिक खंबीर आहे. शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही, अशी ग्वाही शिवसेनेचे नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.(Shiv Sena Dussehra Rally)
 
संकटग्रस्त शेतकऱ्याला पाठबळ देण्यासाठी शिवसेनेकडून वेगवेगळ्या माध्यमातून मदत करण्यात येत आहे. शिवसेनेकडून राज्यातील शेतकऱ्यांच्या मुलांना २५ हजार सायकल वाटप करण्यात येत आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या पत्नींना २५ हजार शिलाई मशीनचे वितरण सुरु आहे. त्याशिवाय दसऱ्यापूर्वीच दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना अन्नधान्याचे वाटप आणि आनंदाचा शिधा शिवसेनेकडून वितरित केला जाणार आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दसरा मेळाव्यात दुष्काळातील शिवसेनेच्या मदतीबाबत सविस्तर बोलणार आहेत. या मेळाव्यात त्यांच्याकडून शिवसैनिकांना दुष्काळात शेतकऱ्यांना मदत करणारा राज्यस्तरीय कार्यक्रम दिला जाईल.(Shiv Sena Dussehra Rally)
 
 




अवंती भोयर

विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....
संबंधित मजकूर