पहिल्या ड्रायव्हरलेस मेट्रोचे अनावरण; मुंबई मेट्रो ४ साठी अल्स्टॉमची स्वयंचलित ट्रेन सज्ज

३९ मेट्रो ट्रेनची निर्मिती;नोव्हेंबरअखेर पहिली ट्रेन मुंबईकडे रवाना होणारMumbai Metro 4 Driverless Train

    16-Oct-2026   


Mumbai Metro 4 Driverless Train

 
 
मुंबई, : (Mumbai Metro 4 Driverless Train)मुंबई मेट्रो मार्गिका ४ आणि ४ए साठी पहिल्या ड्रायव्हरलेस मेट्रो ट्रेनचे अनावरण फ्रान्सच्या अल्स्टॉम कंपनीने नुकतेच आंध्र प्रदेशातील श्री सिटी येथील उत्पादन केंद्रात केले. अवघ्या १४ महिन्यांत या ट्रेनची निर्मिती करण्यात आली असून, या मार्गिकेसाठी तयार करण्यात येणाऱ्या एकूण ३९ मेट्रो ट्रेनपैकी ही पहिली ट्रेन आहे. नोव्हेंबरअखेर ही ट्रेन मुंबईकडे रवाना होण्याची अपेक्षा असून डिसेंबरच्या मध्यापर्यंत ती मुंबईत दाखल होणार आहे.(Mumbai Metro 4 Driverless Train)
 
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) वतीने राबविण्यात येणाऱ्या मेट्रो ४ आणि ४ए प्रकल्पासाठी लार्सन अँड टुब्रो कंपनीला एकात्मिक प्रणाली पॅकेजचे कंत्राट देण्यात आले आहे. महाराष्ट्र शासन, एमएमआरडीए आणि एल अँड टी यांच्या सहकार्याने मुंबई आणि ठाणे शहरांसाठी अत्याधुनिक मेट्रो तंत्रज्ञान उपलब्ध करून दिले जात आहे. प्रगत सिग्नलिंग यंत्रणा, सुरक्षित व आरामदायी प्रवास आणि दिव्यांगांसाठी सुलभ सुविधा ही या ट्रेनची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत. या प्रकल्पांतर्गत अल्स्टॉमकडून ३९ ड्रायव्हरलेस मेट्रो ट्रेन, सिग्नलिंग यंत्रणा, डेपोमधील आवश्यक उपकरणे आणि देखभाल सेवा पुरविण्यात येणार आहेत.(Mumbai Metro 4 Driverless Train)
 
या मेट्रो ट्रेनची अभियांत्रिकी रचना बंगळुरू येथे करण्यात आली असून, श्री सिटी येथे तिची निर्मिती झाली आहे. ट्रेनची प्रोपल्शन यंत्रणा कोईम्बतूर येथून, तर बोगींचा पुरवठा गुजरातमधील सावली येथून करण्यात आला आहे. त्यामुळे ‘मेक इन इंडिया’ उपक्रमांतर्गत देशांतर्गत उत्पादन आणि स्थानिक पुरवठा साखळीला चालना मिळणार आहे.(Mumbai Metro 4 Driverless Train)
प्रवाशांच्या सोयीसाठी ट्रेनमध्ये दिव्यांगांसाठी व्हीलचेअरची जागा, सायकल ठेवण्यासाठी स्वतंत्र रॅक आणि अंतर्गत वातानुकूलन यंत्रणा उपलब्ध असेल. स्वयंचलित तंत्रज्ञानाच्या मदतीने प्रत्येक दिशेला तासाला सुमारे २५ हजार प्रवाशांची वाहतूक करण्याची क्षमता या प्रणालीत अपेक्षित आहे.(Mumbai Metro 4 Driverless Train)
 
मेट्रो ४ ही वडाळा ते ठाण्यातील कासारवडवलीदरम्यान धावणार असून, या उन्नत मार्गिकेची लांबी ३२.३२ किलोमीटर आहे. या मार्गावर एकूण ३० स्थानके असतील. मुंबईत दाखल झाल्यानंतर ट्रेनची संशोधन अभिकल्प व मानक संघटना (आरडीएसओ) आणि मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्तांकडून आवश्यक प्रमाणन प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. दरम्यान, अल्स्टॉमने मुंबई मेट्रोच्या अॅक्वा मार्गिकेसाठीही मेट्रो ट्रेन आणि सिग्नलिंग यंत्रणा पुरविली आहे. मुंबईच्या वाढत्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत स्वयंचलित तंत्रज्ञानाचा समावेश हा महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.(Mumbai Metro 4 Driverless Train)
 




ओंकार मुळ्ये

'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक
संबंधित मजकूर