हलाल प्रमाणित वस्तूंवर पूर्णपणे बहिष्कार टाकावा! ; 'चांदा ते बांधा' मंत्री नितेश राणे यांचे आवाहन

    16-Oct-2026   


Maharashtra Drought Relief

मुंबई (Maharashtra Drought Relief) : शासकीय मान्यता नसतानाही उघड- उघडपणे ७० ते ८० हजार रुपयांमध्ये हलाल प्रमाणपत्रे विकली जात आहेत. कपडे आणि औषधांवरही हलालचे शिक्के मारून समांतर अर्थव्यवस्था उभी करण्याचा प्रयत्न होतो आहे. या हलाल जिहादच्या माध्यमातून गोळा होणारा कोट्यवधी रुपयांचा निधी थेट हिंदू समाज आणि राष्ट्राच्या विरोधात वापरला जातो. सनातन हिंदू धर्मात हलाल संकल्पनेला कोणतीही मान्यता नाही. त्यामुळे हिंदू समाजाने हलाल प्रमाणित कोणत्याही वस्तू अथवा पदार्थांवर पूर्णपणे बहिष्कार टाकावा, " असे आक्रमक आवाहन कॅबिनेट मंत्री नितेश राणे यांनी केले.(Maharashtra Drought Relief)
 
सिंधुदुर्ग येथून हलाल प्रमाणपत्राविरोधात 'चांदा ते बांदा' या राज्यव्यापी हिंदू जनजागृती अभियानाची अधिकृत घोषणा करताना ते माध्यमांशी बोलत होते. ते म्हणाले, कोणत्याही सरकारी किंवा कायदेशीर अधिकारांशिवाय खाजगी संस्थांकडून ७० ते ८० हजार रुपयांना हलाल प्रमाणपत्रे सर्रास विकली जात आहेत. मांसाहारापुरती मर्यादित असलेली ही संकल्पना आता शाकाहारी अन्नपदार्थ, दैनंदिन उपयोगाच्या वस्तू, कपडे आणि जीवनरक्षक औषधांपर्यंत लादली जात आहे. त्याचबरोबर कोणत्याही वस्तूवर हलालचा शिक्का मारून ग्राहकांना ती खरेदी करण्यास भाग पाडले जात आहे.(Maharashtra Drought Relief)
 
या प्रमाणपत्रांच्या माध्यमातून गोळा होणाऱ्या पैशांवर गंभीर आरोप करताना ते म्हणाले, हलाल प्रमाणपत्रांच्या विक्रीतून आणि व्यापारातून जमा होणारा निधी हा 'हलाल जिहाद'चा भाग आहे. हा पैसा राष्ट्रविरोधी कारवायांना आणि हिंदू समाजाला दुर्बल करण्यासाठी वापरला जातो. सनातन हिंदू धर्मपरंपरेमध्ये हलाल संकल्पनेला अजिबात स्थान नाही. असे असताना बहुसंख्य हिंदू समाजावर अशा उत्पादनांची खरेदी अप्रत्यक्षपणे लादणे चुकीचे आहे.(Maharashtra Drought Relief)
 
 




ओंकार मुळ्ये

'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक
संबंधित मजकूर