"मॅड"ची एव्हरेस्ट बेस कॅम्प मोहीम यशस्वी

हिमालयातील मोहीम प्रतिकूल वातावरणात यशस्वी करणाऱ्या डोंबिवलीच्या पहिल्या नगरसेविका डॉ. सुनीता पाटील.Dombivli Everest Base Camp Trek

    16-Oct-2026   


Dombivli Everest Base Camp Trek

डोंबिवली  :(Dombivli Everest Base Camp Trek)हिमवादळांशी दोन हात करत, निसर्गाच्या कठोर परीक्षांवर मात करत डोंबिवलीच्या 'माउंटेनियर्स असोसिएशन'ने (मॅड) पुन्हा एकदा उंच शिखर गाठले आहे. सतीश गायकवाड यांच्या कुशल नेतृत्वाखाली १३ शिलेदारांनी ५,३६४ मीटर उंचीवरील 'एव्हरेस्ट बेस कॅम्प' सर करून मॅडच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे." विशेष म्हणजे या १३ शिलेदारामध्ये केडीएमसीच्या भाजपाच्या नगरसेविका डॉ सुनिता पाटील यांचा समावेश आहे. 
 
माउंटेनियर्स असोसिएशन डोंबिवली संस्थेतर्फे एव्हरेस्ट बेस कॅम्प(5364मीटर उंच )हिमालय मोहीम 24 सप्टेंबर ते 09 ऑक्टोबर 26 या कालावधीत राबविण्यात आली.(Dombivli Everest Base Camp Trek)
 
मॅडची ही तिसरी एव्हरेस्ट बेस कॅम्प मोहीम होती. सातत्याने बदलणारे वातावरण आणि मोठ्या प्रमाणात होणारा हिमवर्षाव अशा प्रतिकूल परिस्थितीत "मॅड "च्या तेरा सभासदानी मोहिम पूर्ण केली. त्यामध्ये देवदत्त दिगवडेकर, प्रतिक दिगवडेकर, मनीष खरात, ज्योती जोशी, माया दिगवडेकर नायर, अभिजीत कुलकर्णी, राम गणपती, विश्वास जोशी, कैवल्य मोडक, सदानंद दांडेकर, पद्माकर गायकवाड व नगरसेविका डॉ सुनीता पाटील या सर्वांनी एव्हरेस्ट बेस कॅम्प मोहीम प्रतिकूल परिस्थितीत यशस्वी केली. सभासदनी या आधी हिमालयात अनेक मोहिमा केल्या आहेत. चादर ट्रेक,मरका व्हॅली, सतोपंथ ट्रेक, तपोवन ट्रेक, व्हॅली ऑफ फ्लॉवर्स असे अनेक ट्रेक केले आहेत अशी माहिती अध्यक्ष सतीश गायकवाड यांनी दिली.(Dombivli Everest Base Camp Trek)
 
एव्हरेस्ट सर करण्याचे एक स्वप्न होते . ते स्वप्न 'एव्हरेस्ट बेस कॅम्प' च्या रुपाने पूर्ण झाले आहे.‌ अशी भावना नगरसेविका डॉ. पाटील यांनी व्यक्त केली.(Dombivli Everest Base Camp Trek)
 




संबंधित मजकूर