धारावीतील ६५० महिलांना आत्मनिर्भरतेची दिशा

धारावी सोशल मिशनचा पुढाकार; प्रशिक्षणासोबत बाजारपेठ आणि रोजगाराच्या संधीही उपलब्धDharavi Social Mission


Dharavi Social Mission
 
मुंबई,: (Dharavi Social Mission)कौशल्य प्रशिक्षणाच्या माध्यमातून महिलांना स्वावलंबनाची संधी उपलब्ध करून देत धारावी सोशल मिशनने (डीएसएम) गेल्या काही महिन्यांत ६५० हून अधिक महिलांच्या आयुष्यात परिवर्तन घडविण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. व्यावसायिक प्रशिक्षण, रोजगाराच्या संधी, बाजारपेठेशी जोडणी आणि स्वयंरोजगारासाठी आवश्यक साहाय्य अशा विविध माध्यमांतून महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचा प्रयत्न संस्थेकडून केला जात आहे.(Dharavi Social Mission)
 
धारावीतील ५१२ महिलांसाठी गुरुवारी (दि. १५) माटुंगा येथील यशवंत नाट्यमंदिरात कौशल्य प्रमाणपत्र वितरण समारंभ आयोजित करण्यात आला. विविध प्रशिक्षणक्रम यशस्वीरीत्या पूर्ण केलेल्या महिलांना यावेळी प्रमाणपत्रे देऊन गौरविण्यात आले. या कार्यक्रमातून महिलांच्या कौशल्याला प्रोत्साहन देण्याबरोबरच त्यांना स्वयंरोजगार आणि उत्पन्ननिर्मितीच्या नव्या संधी उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात आला.(Dharavi Social Mission)
 
शिलाई मशीन ऑपरेटर, हाताने भरतकाम, टेराकोटा दागिन्यांची निर्मिती, मेणबत्त्या व अगरबत्त्या बनविणे, तागाच्या पिशव्या तयार करणे, लेखा सहाय्यक, लेखा कार्यकारी, योग प्रशिक्षक आणि आशय निर्मिती अशा विविध अभ्यासक्रमांचे प्रशिक्षण महिलांनी पूर्ण केले. इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ पॉप्युलर सायन्सेसच्या सेंटर फॉर एजिंग स्टडीजचे प्रमुख प्रा. धनंजय बनसोड, तसेच रोटरी क्लब जुहूच्या लता देसाई आणि नेहा संघवी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.(Dharavi Social Mission)
 
रोटरी क्लबच्या सदस्यांनी महिलांना ५० हातभरतकाम संच भेट दिले. त्यामुळे प्रशिक्षणानंतरही सराव सुरू ठेवून त्यातून उत्पन्न मिळविण्याची संधी महिलांना उपलब्ध झाली. प्रमाणपत्र वितरण सोहळ्यात अनेक महिलांनी स्वतः तयार केलेल्या वस्तूंचे प्रदर्शन भरवून विक्रीही केली. प्रशिक्षणानंतर काही महिलांनी घरबसल्या ऑर्डर स्वीकारण्यास सुरुवात केली असून, स्वतःच्या कलेतून उत्पन्न मिळविण्याचा मार्ग निवडला आहे.
 
प्रिया कांबळे यांनी मेणबत्ती निर्मितीचे प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर स्वतःचा छोटा व्यवसाय सुरू केला. अफ्सा आणि नज्मनेशा यांनी हाताने भरतकामाचे प्रशिक्षण घेतले असून, या कौशल्याच्या माध्यमातून कुटुंबाच्या आर्थिक हातभार लावण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. छाया खराडे आणि कांचन शिंदे यांनी अगरबत्ती निर्मितीचे प्रशिक्षण घेतले. घरात राहून आर्थिक उत्पन्न मिळविण्याची संधी या प्रशिक्षणामुळे उपलब्ध झाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.(Dharavi Social Mission)
 
शिलाई मशीन ऑपरेटरचे प्रशिक्षण घेतलेल्या नाझनीम यांच्यासाठीही हा अनुभव महत्त्वपूर्ण ठरला. शिवणकामाची तंत्रे आत्मसात केल्यानंतर त्या आता ग्राहकांच्या ऑर्डर स्वीकारून विविध प्रकारच्या डिझाइन्स तयार करू शकतात. शेरलीन नाडर यांनीही शिवणकामाच्या ऑर्डर स्वीकारण्यास सुरुवात केली असून, त्यातून कुटुंबाला आर्थिक आधार देण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. भरतकामाच्या प्रशिक्षणात वर्गात दुसरा क्रमांक मिळविणाऱ्या नमिता आरकल यांनीही ऑर्डर स्वीकारून आपल्या कौशल्यातून कमाई करण्यास सुरुवात केली आहे.(Dharavi Social Mission)
 
राजेश्वरी थंगप्पन यांनी प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर तीन महिन्यांच्या उपजीविका इंटर्नशिपची संधी मिळवली. या माध्यमातून त्यांना प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेता येत असून, मासिक विद्यावेतनही मिळत आहे. महिलांना केवळ प्रशिक्षण देऊन न थांबता त्यांच्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्यावरही धारावी सोशल मिशनने भर दिला आहे. यासाठी महिलांना कॉमन फॅसिलिटी सेंटरची माहिती देण्यात आली. या केंद्राच्या माध्यमातून सामायिक उत्पादन सुविधा आणि कामाच्या संधी उपलब्ध होऊ शकतात.(Dharavi Social Mission)
 
 




गायत्री श्रीगोंदेकर

मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.
संबंधित मजकूर