_202610161835276550_H@@IGHT_350_W@@IDTH_696.jpg)
डोंबिवली: (Bailgada Sanghatana Drought Relief)बैलगाडा शर्यतीत मैदाने गाजवणारी अखिल भारतीय बैलगाडा संघटना आता दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी पुढे आली आहे. राज्यातील भीषण दुष्काळी परिस्थितीचा सामना करणाऱ्या बांधवांना आर्थिक आधार देण्यासाठी संघटनेने गुरुवारी डोंबिवलीत भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याकडे मदतीचा धनादेश सुपूर्द केला. संघटनेने जपलेल्या या सामाजिक बांधिलकीचे बैलगाडा प्रेमींकडून जोरदार कौतुक केले जात आहे.(Bailgada Sanghatana Drought Relief)
यावेळी ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यांतील संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. संघटनेचे अध्यक्ष संदीप माळी, प्रवक्ते राहुल पाटील यांच्यासह अन्य सहकारी देखिल यावेळी उपस्थित होते. अखिल भारतीय बैलगाडा संघटनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना करत असलेल्या या मदतीचे बैलगाडा प्रेमींकडून देखील कौतुक केले जात आहे. बैलगाडा चालक,मालक यांसह दुष्काळी भागात टँकरद्वारे पाणी पोहोचवण्याचे काम करणाऱ्या या संघटनेने आता दुष्काळग्रस्तांसाठी आर्थिक मदत दिल्याने सर्वत्र या संघटनेचे कौतुक केले जात आहे.(Bailgada Sanghatana Drought Relief)
संघटनेचे प्रवक्ते राहुल पाटील म्हणाले, बळीराजासाठी संघटनेच्या माध्यमातून ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यांतील पदाधिकारी, अध्यक्ष संदीप माळी आणि सर्व सहकाऱ्यांनी एकत्र येत दुष्काळी भागातील नागरिकांसाठी आर्थिक मदत दिली आहे. शेतकरी हा आपल्या समाजाचा कणा असून, संकटाच्या काळात त्याच्या पाठीशी उभे राहणे ही आपली जबाबदारी आहे. गेल्या वर्षी मुरबाड परिसरात पाणीटंचाई निर्माण झाली होती. त्या वेळीही अखिल भारतीय बैलगाडा संघटनेच्या माध्यमातून आवश्यकतेपेक्षा दुप्पट पाणी उपलब्ध करून देण्यात आले होते. संकटाच्या काळात नागरिकांना दिलासा मिळावा, या उद्देशाने संघटनेने मदतीचा हात पुढे केला होता, असे सांगितले.(Bailgada Sanghatana Drought Relief)